भोपाळमधील ट्विशा शर्मा आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. ट्विशाच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे. ट्विशा मूळची नोएडाची राहणारी होती आणि तिचं डिसेंबर २०२५ मध्ये भोपाळच्या समर्थ सिंहसोबत लग्न झालं होतं. ट्विशाने १२ मेच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
ट्विशाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या पतीचा फोन आला नाही. ट्विशाचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्याच रात्री तो फक्त ५ मिनिटांसाठी रुग्णालयात आला होता. साधारण रात्री १२ ते १ च्या दरम्यान आला आणि थोड्याच वेळात निघून गेला." त्यांनी पुढे आरोप केला की, "माझ्या मुलीला तिचे सासू-सासरे त्रास देत होते. सासू प्रत्येक गोष्टीवरुन तिला बोलायची."
"हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
"माझी मुलगी खूप शूर होती"
ट्विशाच्या आईने 'पीटीआय' (PTI) शी बोलताना सांगितलं की, "माझी मुलगी खूप शूर होती. ती खूप चांगली मुलगी होती. हे सासरचे लोक तिच्यावर खोटे आरोप करत आहेत." ट्विशा आणि समर्थ यांचं लग्न डिसेंबर २०२५ मध्ये झालं होतं. त्या दोघांची ओळख 'शादी डॉट कॉम'वर झाली होती. ट्विशा नोएडाची राहणारी होती, तर समर्थ भोपाळचा रहिवासी आहे.
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
हुंड्यासाठी ट्विशाचा छळ
ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी सांगितलं की, लग्नानंतर काही काळापर्यंत सर्व काही ठीक होतं, पण नंतर सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी ट्विशाचा छळ करण्यास सुरुवात केली. १२ मेच्या रात्री १० वाजता ट्विशाने तिच्या आईला फोन केला होता आणि सांगितले होतं की, "माझा खूप छळ केला जात आहे, मी आता हे आणखी सहन करू शकत नाही."
सुनेच्या टोमण्याने घेतला सासू-सासऱ्यांचा बळी; मॉडर्न कपड्यांवरुन वाद, लग्नानंतर कुटुंब उद्ध्वस्त
यानंतर काही वेळातच ट्विशाची सासू गिरीबाला सिंह यांनी तिच्या आईला फोन करून सांगितलं की, "आम्ही ट्विशाला एम्स (AIIMS) मध्ये घेऊन जात आहोत, ती श्वास घेत नाही." याच रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणाही आढळल्या आहेत.
Web Summary : Twisha Sharma's death in Bhopal is under investigation amid dowry allegations. Her mother claims Twisha was harassed by her in-laws for dowry. Twisha told her mother about the abuse before her death.
Web Summary : भोपाल में ट्विशा शर्मा की मौत दहेज के आरोपों के बीच जांच के दायरे में है। उसकी माँ का दावा है कि ट्विशा को ससुराल वालों ने दहेज के लिए प्रताड़ित किया। ट्विशा ने अपनी माँ को अपनी मृत्यु से पहले दुर्व्यवहार के बारे में बताया।