मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये निवृत्त न्यायाधीशांची सून ट्विशा शर्मा हिच्या मृत्यू प्रकरणाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. १२ मे रोजी ट्विशाचा मृत्यू झाला यानंतर, या प्रकरणातील आरोपींपैकी एक असलेली तिची सासू गिरिबाला सिंहने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी दावा केला होता की, ट्विशा कुटुंबाशी जुळवून घेऊ शकत नव्हती आणि ती ड्रग्ज घ्यायची.
ट्विशा आणि तिच्या आईमधील शेवटचं व्हॉट्सॲप चॅट आता समोर आलं आहे. आईशी बोलताना ती प्रचंड मानसिक त्रासात असल्याचं दिसत आहे. यामध्ये ट्विशाने आपल्या सासरच्या लोकांबद्दल अनेक गंभीर गोष्टी लिहिल्या आहेत आणि पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप केला आहे.
"हे लोक मला जगू देणार नाहीत"
व्हॉट्सॲप चॅटनुसार, ट्विशाने आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये "‘मी खूप त्रस्त आहे… हे लोक खूप घाणेरडे आहेत. संशय घेतात. समर्थ विचारतो की, माझ्या पोटात कोणाचं मूल आहे. तू येथे ये आणि मला इथून घेऊन जा, हे लोक मला जगू देणार नाहीत. माझं आयुष्य नरक बनलं आहे. हे लोक खूप निर्दयी आहेत. समर्थ तर माझ्याशी नीट बोलतही नाही" असं म्हटलं आहे.
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
"मी अडकले आहे, तू अडकू नकोस"
यापूर्वीही ट्विशाचं मैत्रीण मीनाक्षीसोबतचं इन्स्टाग्राम चॅट समोर आलं आहे, ज्यामध्ये ती मैत्रिणीला म्हणत होती, "मी अडकले आहे, तू अडकू नकोस, मी जास्त बोलू शकणार नाही." आपल्या जामीन अर्जात गिरिबाला यांनी दावा केला होता की, सून ड्रग्ज घ्यायची आणि ड्रग्ज न मिळाल्यास तिचे हात थरथरायचे.
सुनेच्या टोमण्याने घेतला सासू-सासऱ्यांचा बळी; मॉडर्न कपड्यांवरुन वाद, लग्नानंतर कुटुंब उद्ध्वस्त
चित्रपटांमध्ये केलं आहे काम
सासूने सांगितलं की, ट्विशा लग्नाआधी अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने तेलगू आणि इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. तसेच जाहिरातींमध्ये काम केलं होतं. लग्नाच्या वेळी ट्विशा दिल्लीतील एका खासगी कंपनीत 'वर्क फ्रॉम होम' करत होती. घरात राहताना तिच्या वागण्यावरून आम्हाला ती ड्रग्ज घेत असल्याचा संशय आला, त्यानंतर तिच्या वडिलांनीही या गोष्टीला दुजोरा दिला होता.
Web Summary : Twisha Sharma's final chat reveals she faced immense mental distress, accusing her in-laws of cruelty and her husband of infidelity. She felt trapped and feared for her life, alleging constant suspicion and abuse.
Web Summary : ट्विशा शर्मा की अंतिम चैट से पता चलता है कि उसे अत्यधिक मानसिक कष्ट हुआ, उसने अपने ससुराल वालों पर क्रूरता और अपने पति पर बेवफाई का आरोप लगाया। उसने फंसा हुआ महसूस किया और अपनी जान से डर गई, लगातार संदेह और दुर्व्यवहार का आरोप लगाया।