शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:46 IST

रेल्वे मंत्रालयाने भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारतातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ट्रेनची झलक रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरवर धावणाऱ्या या ट्रेनचे डिझाइन पूर्णपणे एयरोडायनामिकवर आधारित आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मते, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२७ रोजी करण्याचे उद्दिष्ट आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांवर येणार आहे.

भारताची बुलेट ट्रेन जपानच्या ज्या मॉडेलवर तयार झाली आहे त्या ट्रेनला तिथल्या भाषेत हायबुसा म्हटले जाते. ही जपानमधील सर्वात आधुनिक हाय-स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनचा पुढचा भाग एखाद्या पक्ष्याच्या चोचीसारखा किंवा लांब नाकासारखा दिसतो. हा स्टाईलचा भाग नसून त्यामागे विज्ञान आहे. जेव्हा ट्रेन ३२० किमी प्रतितास या वेगाने बोगद्यात शिरते, तेव्हा हवेचा प्रचंड दाब निर्माण होतो. या लांब नाकामुळे हवेचा रोध कमी होतो आणि बोगद्यातून बाहेर पडताना होणारा तीव्र आवाज रोखला जातो.

ही ट्रेन ३०० ते ३२० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावते, पण आत बसलेल्या प्रवाशांना साधा झटकाही जाणवत नाही. यामध्ये अत्यंत प्रगत सस्पेंशन सिस्टम आणि लिनियर मोटर टेक्नॉलॉजी वापरली आहे. याच्या अल्ट्रा-स्मूथ ट्रॅक डिझाईनमुळे प्रवाशांना विमानात बसल्यासारखा लक्झरी अनुभव मिळतो.

भूकंप येण्यापूर्वीच थांबते ट्रेन

जपान हा भूकंपाचा देश असल्याने या ट्रेनची सुरक्षा यंत्रणा तशीच तयार केली गेली आहे. ट्रेनमध्ये बसवलेले सेन्सर्स भूकंपाचे सूक्ष्म धक्केही लगेच ओळखतात. धक्का जाणवताच ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम सुरु होते आणि अवघ्या काही सेकंदांत ट्रेन थांबते.

भारत आणि जपानचे कनेक्शन काय?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोर हा पूर्णपणे भारत आणि जपान यांच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. म्हणजेच या ट्रेनचे तंत्रज्ञान, सुरक्षा प्रणाली आणि डिझाइन फिलॉसॉफी पूर्णपणे जपानी आहे. त्यामुळेच समोर आलेली पहिली भारतीय बुलेट ट्रेन जपानच्या E5 Shinkansen सारखीच दिसत आहे.

काय बदलणार?

जपानचे तंत्रज्ञान वापरले जात असले तरी भारताचे हवामान, येथील गर्दी, ट्रॅकची रचना आणि ऑपरेशनल पद्धती लक्षात घेता या मॉडेलमध्ये काही महत्त्वपूर्ण भारतीय बदल केले जातील. 

पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम 

ही बुलेट ट्रेन पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. यामध्ये हाय-इफिशियन्सी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रति प्रवासी ऊर्जेचा वापर अत्यंत कमी होतो. 

प्रकल्पाची सद्यस्थिती

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुजरात आणि महाराष्ट्रात या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक टाकणे, पिलर्स उभारणे आणि अत्याधुनिक स्टेशन्सच्या बांधकामाने गती घेतली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's First Bullet Train Unveiled: Japanese Technology Powers High-Speed Rail

Web Summary : India's first bullet train, inspired by Japan's Shinkansen, is set to launch August 15, 2027, cutting Mumbai-Ahmedabad travel to two hours. Featuring advanced safety and aerodynamics, it adapts Japanese tech to Indian conditions for eco-friendly, efficient travel.
टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनIndian Railwayभारतीय रेल्वे