शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
3
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
4
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
5
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
6
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
7
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
8
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
9
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
10
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
11
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
12
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
13
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
14
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
15
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
16
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
17
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
18
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
20
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या इच्छेखातर अल्पवयीन मुलीचा थाटला विवाह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 21:42 IST

त्या मैत्रिणीने एका महिला समाजसेविकेशी संपर्क साधत सर्व प्रकार सांगितला.

ठळक मुद्देकोळसेवाडी पोलिसांना सदरची बाब सांगताच मुलीचा होणारा विवाह कुटुंबियांनी रद्द केला.मुलीच्या आजीच्या आजारपणामुळे मुलीचे लग्न लावत होतो अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली.

कल्याण - आजारी आजीच्या इच्छेखातर एका कुटुंबाने आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याची घाई केली. मात्र, एका महिला समाजसेविकेला याबाबतची माहिती मिळताच तिने कोळसेवाडी पोलिसांना सदरची बाब सांगताच मुलीचा होणारा विवाह कुटुंबियांनी रद्द केला.

पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात हे कुटुंबिय राहतात. कुटुंबातील १७ वर्षीय मुलीचे लग्न आजारी आजीला जिवंत असेपर्यंत बघायचे होते. त्यामुळे, तिच्या कुटुंबियांनी तिला स्थळ बघायला सुरुवात करत तिचा साखरपुडा देखील उरकला. तिचे लग्न ३ मार्चला लग्न नाशिक येथील सिन्नर येथे होणार होते. मात्र, मुलीला लग्न करायचे नसल्याने तिने आपल्या मैत्रिणीकडे आपला शाळेचा दाखला आणि लग्नपत्रिका पोहचवली. त्या मैत्रिणीने एका महिला समाजसेविकेशी संपर्क साधत सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर, पोलिसांनी सर्व सत्यता पडताळून मुलीच्या आईवडिलांना संपर्क साधला. मुलीच्या आजीच्या आजारपणामुळे मुलीचे लग्न लावत होतो अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली. मात्र, आता आम्ही हे लग्न रद्द करत असल्याचेही पोलिसांना लेखी दिले.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसkalyanकल्याण