शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 22:43 IST

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी बाप्पाला ७ हजार आंब्यांची आकर्षक आरास करुन महानैवेद्य दाखविण्यात आला. तसेच यानिमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने सकाळची आरती बी. यू. भंडारी ग्रूपचे चंद्रवर्धन भंडारी व उल्हास घाटगे यांनी सपत्नीक तसेच चिवडेवाले रामचंद्र भगवानदास यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनीही आरतीत सहभागी होत मंगलमय वातावरणाचा अनुभव घेतला.

आंबा महोत्सवासाठी यंदा तब्बल ७ हजार आंब्यांचा वापर करून बाप्पांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवलेले गणरायाचे रूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरत असून, दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या सजावटीसाठीचे आंबे शहरातील विविध अनाथ आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत.     दरम्यान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, पुणेकर भक्तांमध्ये या सोहळ्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

"हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पावर पुणेकरांसह संपूर्ण राज्यातील भाविकांची विशेष श्रद्धा आहे. आज अक्षय तृतियेनिमित्त बाप्पाला ७ हजार आंब्यांचा आरासरुपी दाखवलेला केवळ महानैवेद्य नसून मानवतेचीही पूजा आहे. कारण हे सर्व आंबे शहरातील विविध आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत. बाप्पाचा भाविक म्हणून आमच्या सर्वांसाठीच हे अत्यंत पवित्र कार्य असून आमच्या हातून ते असंच वाढत जावो, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना." - पुनीत बालन, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Celebrates Akshay Tritiya with Mango Festival

Web Summary : Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust celebrated Akshay Tritiya with an 'Aamba Mahotsav,' offering 7,000 mangoes to Lord Ganesha. The temple was beautifully decorated, attracting devotees. The mangoes will be distributed to local orphanages, continuing the annual tradition with enthusiastic participation from Pune residents.
टॅग्स :PuneपुणेMangoआंबा