अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघाने दोन नव्या भिडूंसह मैदानात उतरण्याला पसंती दिली. पण नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना MI चा पहिला डाव दुसऱ्याच षटकात फसवा ठरला. कगिसो रबाडाने MI कडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या दानिश मालेवार याला अवघ्या २ धावांवर पायचित करत तंबूचा रस्ता दाखवला. तो एवढ्यावरच थांबला नाही. क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादवच्या रुपात पॉवर प्लेमध्ये रबाडाने मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला
रबाडाने आपल्या पहिल्या दोन षटकात दोन विकेट्स घेतल्यावर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं पॉवर प्लेमधील शेवटचे षटक टाकण्यासाठी त्याच्यावरच भरवसा दाखवला. सूर्या दादानं षटकार मारून त्याचे स्वागत केले. पुढच्या चेंडूवर खणखणीत चौकार मारत सूर्यकुमार यादवनं या षटकात दोन चेंडूत १० धावा काढल्या, पण या षटकातील पाचव्या चेंडूवर रबाडाने हिशोब चुकता केला. रबाडाने १५२.१ किमी प्रति तास वेगाने टाकलेल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला क्लीन बोल्ड केले. रबाडाने फक्त त्रिफळा उडवला नाही तर स्टंपचे दोन तुकडे करत षटकार चौकार मारल्याचा बदला घेतला.
पॉवर प्लेमध्ये रबाडाचा कहर, MI ची अवस्था केली बिकट
दानिश मालेवार आणि क्विंटन डी कॉक जोडीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. मुंबई इंडियन्सच्या डावातील दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर रबाजाने पदार्पण करणाऱ्या दानिश मालेवारला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रबाडाने शतकवीर क्विंटन डी कॉकची शिकार केली.
Web Summary : In the GT vs MI match, Rabada dismissed Malewar early. He then removed De Kock and later clean bowled Suryakumar Yadav after being hit for a six and four, breaking the stumps with a 152.1 kmph delivery.
Web Summary : जीटी बनाम एमआई मैच में, रबाडा ने मालेवार को जल्दी आउट किया। फिर डी कॉक को हटाया और बाद में सूर्यकुमार यादव को छह और चार खाने के बाद क्लीन बोल्ड कर दिया, 152.1 किमी प्रति घंटे की रफ्तार से स्टंप तोड़ दिए।