शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 21:59 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ९३ दिवस 'ऑपरेशन महादेव' राबवले.

पहलगामच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांच्या रक्ताने होळी खेळणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने यमसदनी धाडले आहे. तब्बल ९३ दिवस चाललेले 'ऑपरेशन महादेव' यशस्वी झाले असून, लष्कराने लश्कर-ए-तैयबाच्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या शत्रूला सोडले जाणार नाही, हाच इशारा या कारवाईतून लष्कराने दिला आहे.

२२ एप्रिलचा तो काळा दिवस

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगामच्या बैसरन भागात दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी शांत न बसता या नराधमांचा शोध सुरू केला. चश्मदीद आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आणि 'ऑपरेशन महादेव'ची आखणी करण्यात आली.

दाचीगामच्या घनदाट जंगलात मृत्यूचा सापळा

तपासात असे समोर आले की, हे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या डोंगरदऱ्यातून पळून दाचीगामच्या घनदाट जंगलात लपले आहेत. हे जंगल इतके भयावह आणि दुर्गम आहे की तिथे मोहीम राबवणे लष्करासाठी मोठे आव्हान होते. मात्र, भारतीय लष्कराने पॅरा स्पेशल फोर्सेसला पाचारण केले आणि दहशतवाद्यांच्या सुटकेचे सर्व मार्ग बंद केले.

ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लष्कराने ड्रोन आणि हाय-टेक कॅमेऱ्यांची मदत घेतली. १० जुलै २०२५ रोजी हे ऑपरेशन निर्णायक टप्प्यात पोहोचले. सुरक्षा दलांनी या तिन्ही दहशतवाद्यांना एका मर्यादित परिसरात वेढा घातला.

१० तासांची पायपीट अन् अंतिम प्रहार

२८ जुलै २०२५ ची पहाट या दहशतवाद्यांसाठी अखेरची ठरली. पॅरा स्पेशल फोर्सेसच्या टीमने अत्यंत कठीण पहाडी वाटेने सुमारे १० तास सलग पायपीट करत दहशतवाद्यांच्या अड्ड्यापर्यंत मजल मारली. तिथे झालेल्या जोरदार चकमकीत लष्कराने तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे ऑपरेशन भारतीय लष्कराचे धाडस, अजोड रणनीती आणि संकल्पाचे प्रतीक मानले जात आहे. पर्यटकांवर हल्ला करून काश्मीरचे शांततामय वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Army avenges Pahalgam attack, eliminates terrorists in Operation Mahadev.

Web Summary : Indian Army successfully concluded 'Operation Mahadev' after 93 days, eliminating three Lashkar-e-Taiba terrorists involved in the Pahalgam tourist attack. The operation in Dachigam's dense forests showcases the army's courage and strategic prowess, sending a strong message to those disrupting peace in Kashmir.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान