शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 21:15 IST

खुनाच्या घटनेचा उलगडा : आरोपी महिलेला २४ एप्रिलपर्यंत कोठडी...

चाकूर (जि.लातूर) : चाकुरातील देवांश मंगेश स्वामी (७ वर्षे) या बालकाचा तिच्या चुलतीने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी घडली होती. ही घटना शेतजमिनीच्या वाटणीवरून घडल्याची फिर्याद दिल्याने रविवारी रात्री गुन्हा झाला होता. मात्र, पोलिस तपासात या प्रकरणाला पूर्णपणे कलाटणी मिळाली आहे. आरोपीच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून आरोपी पत्नीने स्वत:च्या आणि दिराच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचून दिराच्या मुलाचा खून केला व पतीच्या मैत्रिणीला अडकविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

या प्रकरणी अनिता स्वामी हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून तिला रात्रीच अटक करण्यात आली. सोमवारी चाकूरच्या न्यायालयाने तिला २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत. चाकूर येथील पुजारी चंद्रकांत स्वामी यांचे नातू साईचरण आणि त्याचा चुलत भाऊ देवांश हे रविवारी सकाळी ७वा.च्या सुमारास घराबाहेर गेले होते. ते घरी परतले नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा घराजवळील एका पडक्या वाड्यात ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांशचा मृतदेह आढळला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली.

पाेलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये विसंगती...

फिर्यादी मंगेश स्वामी यांची भावजय अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन संशयास्पद असल्याचे आढळले. अनिताचा मोबाइल दोन तास बंद होता. तिने केलेल्या आणि आलेल्या कॉलची पडताळणी करण्यात आली, तेव्हा ती काही काळ घराबाहेर होती. चौकशीत विसंगत माहिती येत असल्याने पोलिसांनी तिच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

अनैतिक संबंध असलेल्या महिलेस अडकविण्याचा प्रयत्न...

अनिता स्वामी यांच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या वादातून पोलिसात एक तक्रार दाखल होती. त्यावरून अनिता व तिच्या पतीमध्ये वारंवार वाद, भांडणे होत असत. स्वतःच्या दिराचा मुलगा देवांश याच्या अपहरणाचा बनाव रचून त्याचा खून केला. हा आरोप पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेवर टाकून तिला अडकविण्यासाठी कट अनिता स्वामी हिने रचला. गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह बाजूच्या पडक्या वाड्यात टाकून दिले, असे तपासात निष्पन्न झाल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

पाेलिस पथकांकडून कसून तपास सुरू...

देवांशचा खून करण्याच्या कटात कोणकाेण सहभागी आहेत, नेमका कशा पद्धतीने खून करण्यात आला, साईचरणला लातूरपर्यंत कोणी सोडले, याचा तपास सुरू आहे. तपासात सीसीटीव्हीचे फुटेज महत्त्वाचे ठरल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपअधीक्षक रविंद्र चौधर, पोनि. बालाजी भंडे उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर