पश्चिम आशियातील जागतिक समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. यातच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल रविवारी अचानक सौदी अरेबियात पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी सौदीअरेबियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऊर्जा सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. खरेतर, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
अजित डोवाल यांच्या या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार खाडी देशांशी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी डोवाल १९ एप्रिल रोजी सौदी दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी सौदीचे ऊर्जा मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या समपदस्थ सुरक्षा सल्लागारांशी उच्चस्तरीय चर्चा केली.
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि सौदीमधील लष्करी करार आणि भारताचे सौदीशी असलेले जुने व्यापारी संबंध पाहता, अजित डोभाल यांचा हा दौरा भारताच्या सामरिक हितासाठी 'हुकमी एक्का' मानला जात आहे. या भेटीत, पश्चिम आशियातील परिस्थिती नेमकी कशी बदलत आहे आणि त्याचे भविष्य काय असेल, या मुद्द्यांवर अधिक भर होता."
भारताची ४०% तेल आयात ही खाडी देशांतून -भारताची ४०% तेल आयात ही खाडी देशांतून होते. 'होर्मुज स्ट्रेट' या जागतिक तेल पुरवठा मार्गावर निर्माण झालेल्या संकटामुळे भारताच्या तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. जर पुरवठा विस्कळीत झाला, तर देशात इंधनाचे दर वाढू शकतात. यामुळेच डोभाल तेल पुरवठा करणाऱ्या बड्या देशांशी संवाद साधत आहेत.
अमेरिका-इराण संघर्ष आणि भारताची भूमिकामहत्वाचे म्हणजे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेसंदर्भात चर्चा सुरू असतानाच हा दौरा होत आहे. अमेरिकेने इराणचे एक जहाज जप्त केले होते. यामुळ सोमवारी जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली होती.
Web Summary : Ajit Doval's sudden Saudi visit, amid US-Iran tensions, focuses on energy cooperation and regional stability. India, heavily reliant on Gulf oil, seeks to safeguard supplies. Discussions covered evolving West Asian dynamics and strategic interests, strengthening ties with Saudi Arabia.
Web Summary : अजित डोभाल की अचानक सऊदी यात्रा, अमेरिका-ईरान तनाव के बीच, ऊर्जा सहयोग और क्षेत्रीय स्थिरता पर केंद्रित है। खाड़ी तेल पर अत्यधिक निर्भर भारत आपूर्ति सुरक्षित करना चाहता है। चर्चाओं में पश्चिम एशियाई गतिशीलता और रणनीतिक हितों को शामिल किया गया।