जपानच्या उत्तर-पूर्व भागात स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४:५३ वाजता ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरात जमिनीखाली अवघ्या १० किमी खोलीवर होता. या भीषण हादऱ्यानंतर जपान हवामान खात्याने उत्तर किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला असून ३ मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची भीती व्यक्त केली आहे.
त्सुनामीचा इशारा मिळताच हचिनोहे आणि इतर बंदरांवरील जहाजांनी लाटांच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी तातडीने खोल समुद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. किनारपट्टीवर 'Tsunami! Evacuate!' अशा सूचनांचे फलक झळकत आहेत. भूकंपाच्या एक तासाच्या आत इवाते प्रांतातील कुजी बंदरावर ८० सेंटीमीटर (३१ इंच) उंचीची पहिली लाट धडकली आहे. पुढील काही तासांत लाटांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
रेल्वे वाहतूक ठप्पसुरक्षेच्या कारणास्तव टोकियो आणि शिन-आओमोरी दरम्यानची तोहोकू शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवा तात्काळ थांबवण्यात आली आहे. आओमोरी आणि मियागी प्रांतातील ओनागावा आणि हिगाशिदोरी अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये अद्याप कोणतीही समस्या आढळलेली नाही.
पंतप्रधानांचे आवाहनजपानच्या पंतप्रधान साने टाकाइची यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून, नागरिकांना सखल भागातून उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. "जिवितहानी टाळण्यासाठी सूचनांचे पालन करा आणि समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहा," असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
Web Summary : A 7.5 magnitude earthquake struck Japan, triggering tsunami warnings. Ships fled to sea, and coastal areas evacuated. Bullet train services halted. The Prime Minister urged residents to move to higher ground.
Web Summary : जापान में 7.5 तीव्रता का भूकंप, सुनामी की चेतावनी जारी। जहाजों का समुद्र की ओर पलायन, तटीय क्षेत्रों को खाली कराया गया। बुलेट ट्रेन सेवाएँ रोकी गईं। प्रधानमंत्री ने निवासियों से ऊँचे स्थानों पर जाने का आग्रह किया।