शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:05 IST

Iran warns US retaliation Hormuz: इराणने अमेरिकेला हॉर्मुझमधील जहाज कारवाईचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. "जहाजावर कुटुंबीय असल्याने आम्ही शांत राहिलो," असे इराणने म्हटले आहे. चीनची प्रतिक्रिया आणि कतारमधील तज्ज्ञांचे मत वाचा सविस्तर.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन नौदलाने केलेल्या कारवाईमुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित 'तस्नीम' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने जेव्हा 'एमव्ही तूस्का' जहाजावर हल्ला करून ते ताब्यात घेतले, तेव्हा इराणी लष्कर चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज होते. मात्र, त्या जहाजावर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय असल्याने त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन इराणने तात्काळ कारवाई टाळली.

इराणची भूमिका: "बदला नक्की घेणार"इराणने म्हटले आहे की, "जहाजावर उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित होताच, इराणचे लष्कर अमेरिकन कारवाईला योग्य उत्तर देईल." इराणने या घटनेला 'युद्धविरामाचे उल्लंघन' म्हटले असून, या आठवड्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

चीनचा सावध पवित्रा: "तणाव वाढवणे थांबवा"इराणी जहाज ताब्यात घेतल्याबद्दल चीनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटले की, "हॉर्मुझमधील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. सर्व बाजूंनी जबाबदारीने वागून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून या जागतिक सागरी मार्गावरील सामान्य वाहतूक पुन्हा सुरू होईल."

तज्ज्ञांचे मत: इराणकडे पर्याय मर्यादित?कतारमधील तज्ज्ञ राशीद अल-मोहनादी यांच्या मते, इराण जरी कठोर भाषेचा वापर करत असला, तरी सध्या त्यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत: एकतर थेट युद्ध किंवा चर्चा. इराणला ही चर्चा आपल्या अटींवर करायची आहे, जी सध्या अमेरिकेला मान्य नाही. होर्मुझचा मार्ग काही काळासाठी खुला करणे हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होता, मात्र अमेरिकेने आपली नाकेबंदी न उठवल्याने हा प्रयत्न फसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran almost seized MV Tuska; Family safety averted clash.

Web Summary : Iran refrained from seizing MV Tuska due to crew families onboard. Iran vows retaliation for the American action, potentially impacting peace talks. China urges de-escalation amid heightened tensions in the Strait of Hormuz. Experts see limited options for Iran: direct talks or war.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध