रितेश देशमुखच्या ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते त्या 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज मुंबईत संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून 'राजा शिवाजी' या भव्यदिव्य सिनेमाबाबत चाहत्यांच्या अपेक्षा आता आणखीणच वाढल्या आहेत.
'राजा शिवाजी' सिनेमाचा ३.०६ मिनिटांचा ट्रेलर उत्कंठावर्धक आहे. ट्रेलरची सुरुवात मुघलांचा झेंडा पाहून बाल शिवाजींनी विचारलेल्या एका प्रश्नापासून होते. मुघलांचे अमानुष अत्याचार झुगारून लावत स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न शिवरायांनी बालपणीच पाहिल्याची साक्ष ट्रेलरमधील हा क्षण देतो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख दमदार एन्ट्री घेत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. जबरदस्त अॅक्शन सीन्स, भव्यदिव्य सेट आणि व्हीएफएक्स यांची उत्तम सांगड घातल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखसोबतच ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतो तो शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी महाराज यांच्या भूमिकेत असलेला अभिषेक बच्चन. ट्रेलरमध्ये अफजल खान, मासाहेब जिजाऊ, संभाजी महाराज यांच्या तोंडी असलेले संवादही अगदी चपखल बसल्याचं दिसत आहे.
रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क झाले आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. या सिनेमात बॉलिवूड कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे. जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक बच्चन संभाजी महाराज, संजय दत्त अफजल खान, भाग्यश्री माँसाहेब जिजाऊ यांच्या भूमिका साकारणार आहेत. याशिवाय फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, महेश मांजरेकर, विद्या बालन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १ मे रोजी 'राजा शिवाजी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : The 'Raja Shivaji' trailer is out, showcasing Ritesh Deshmukh as Shivaji Maharaj. Abhishek Bachchan plays Sambhaji Maharaj. The film boasts grand sets, VFX, and a star-studded cast including Sanjay Dutt and Genelia Deshmukh. Releasing May 1st.
Web Summary : 'राजा शिवाजी' का ट्रेलर जारी, रितेश देशमुख शिवाजी महाराज के रूप में। अभिषेक बच्चन संभाजी महाराज की भूमिका में हैं। फिल्म में भव्य सेट, वीएफएक्स और संजय दत्त और जेनेलिया देशमुख सहित कलाकारों की भरमार है। 1 मई को रिलीज हो रही है।