Vaibhav Suryavanshi Crying viral video: राजस्थान रॉयल्सला SRH विरुद्ध पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतर KKR कडूनही पराभव पत्करावा लागला. सलग दोन पराभवांमुळे राजस्थान संघातील सर्व खेळाडूंना वाईट वाटले. या पराभवानंतर वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यानंतरचा आहे. या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशी दुःखी दिसत आहे. वैभवसोबत नेमके काय घडले? याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्सचा २ चेंडू आणि ४ गडी राखून पराभव केला. सामन्यात कोलकाताच्या वरूण चक्रवर्तीने १४ धावांत ३ बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. या सामन्यात राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने ४६ धावांची खेळी केली. पण त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर तो प्रचंड दु:खी झाल्याचे पाहायला मिळाले. एका व्हायरल व्हिडीओमध्ये वैभव एकटाच बाऊंड्री लाईनवर बसलेला दिसला. तो पाठमोरा बसून खंत व्यक्त करत होता. इतर काही खेळाडू त्याला समजवण्यासाठी आले आणि त्यांच्याशी बोलतानाही तो हताश दिसून आला. वैभव त्यावेळी रडत होता असा दावाही काहींनी केला. पण वैभव खरंच रडला की नाही, याची पुष्टी करणारा व्हिडीओ समोर आलेला नाही. एक मात्र नक्की की, वैभव पराभवानंतर खूपच निराश दिसून आला. पाहा व्हिडीओ-
राजस्थानसाठी ट्रॉफी जिंकणे हेच ध्येय– वैभव
आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात वैभव सूर्यवंशीला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या ध्येयाबाबत बोलताना तो म्हणाला होता की, त्याला त्याच्या संधासाठी आयपीएल २०२६ची ट्रॉफी जिंकायची आहे. राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी जिंकावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती. ते ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नात, राजस्थानने लीगची दमदार सुरुवात केली होती. मात्र, शेवटचे दोन सामने गमावल्यामुळे गुणतालिकेतील संघाच्या स्थानात थोडा बदल झाला. त्यामुळेच वैभव काहीसा निराश दिसून आला.
Web Summary : After Rajasthan Royals' defeat, Vaibhav Suryavanshi's emotional state sparked debate. Despite his 46 runs, the loss left him disheartened, fueling speculation about tears. He aims for Rajasthan to win the IPL trophy.
Web Summary : राजस्थान रॉयल्स की हार के बाद, वैभव सूर्यवंशी की भावनात्मक स्थिति पर बहस छिड़ गई। 46 रन बनाने के बावजूद, हार ने उन्हें निराश कर दिया, जिससे आँसुओं के बारे में अटकलें तेज हो गईं। उनका लक्ष्य राजस्थान को आईपीएल ट्रॉफी जिताना है।