Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:07 IST

1 / 9
आजच्या काळात इंटरनेट हा असा प्लॅटफॉर्म बनला आहे, जिथे एखादी व्यक्ती व्हायरल झाली की तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भुईमुगाच्या शेंगा (कच्चा बादाम) विकणारा भुबन बड्याकर अचानक सोशल मीडियावर चर्चेत आला होता.
2 / 9
कोणीतरी भुबनचं गाणं गात भुईमुगाच्या शेंगा विकतानाचा व्हिडीओ बनवून इंटरनेटवर टाकला आणि त्यानंतर त्यांची सर्वत्र चर्चा झाली. तो तुफान व्हायरल झाला.
3 / 9
भुबन बड्याकर रातोरात स्टार बनला. मोठे रील क्रिएटर्स त्याच्या गाण्यावर व्हिडीओ बनवू लागले, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली. भुबनला म्युझिक व्हिडिओमध्ये काम मिळू लागलं आणि त्यातून त्याने चांगले पैसेही कमावले. मात्र आता तो कुठेच दिसत नाही.
4 / 9
भुबनच्या चाहत्यांना आता चिंता लागली आहे. नुकतंच बीबीसीने बीरभूम जिल्ह्यातील भुबन बड्याकरच्या गावात जाऊन त्याची भेट घेतली. भुबन जो पूर्वी एका छोट्या झोपडीत राहायचा, आता एका पक्क्या घराचा मालक झाला आहेत. त्याने स्वतःसोबतच आपल्या वस्तीचाही विकास केला आहे.
5 / 9
भुबनच्या घरात आधी स्वयंपाकघर नव्हतं, ते आता बांधलं गेलं आहे. गेल्या पाच वर्षांत त्याचं आयुष्य इतकं बदललं आहे की, ज्या स्वयंपाकघरात कधीतरी भाजी यायची, तिथे आता रोज भाजी येते आणि घरातील सर्व सदस्य पोटभर जेवण करतात.
6 / 9
भुबनची मुलंही या बदललेल्या आयुष्यात आनंदी आहेत. त्याच्या मुलाचं म्हणणं आहे की, पाच वर्षांपूर्वी ते ज्या परिस्थितीत होते, त्यातून बाहेर पडल्याचा त्यांना आनंद आहे. त्यांचे वडील आता घरी चांगलं जेवण आणतात.
7 / 9
भुबन आता भुईमुगाच्या शेंगा विकत नाही. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो आता बांबूच्या टोपल्या आणि पंखे बनवून विकतो. काही महिन्यांपूर्वी निशू तिवारी या युट्युबरनेही भुबनची भेट घेतली होती, तेव्हा त्याने आपल्या समस्यांचा पाढा वाचला होता.
8 / 9
भुबनने सांगितलं की, त्याला त्याच्या व्हायरल गाण्यासाठी कोणतीही 'रॉयल्टी' मिळत नाही. मनोरंजन सृष्टीतील काही लोकांनी त्याला मोठी स्वप्नं दाखवून आपल्या जाळ्यात अडकवलं.
9 / 9
भुबनकडून त्याचं प्रसिद्ध गाणं रेकॉर्ड करून घेऊन एका करारावर स्वाक्षरी करून घेतली, ज्यामुळे त्याच्या हातातील 'कच्चा बादाम' गाण्याचे कॉपीराइट्स गेले. अशाप्रकारे भुबनची मोठी फसवणूक झाली आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल