शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:52 IST

सकाळी उठल्याबरोबर फोनवर येणारे ५० नोटिफिकेशन्स, कॉलेज असाइनमेंटची निवड, दुपारच्या जेवणाचा मेन्यू, संध्याकाळी कोणत्या जॉबसाठी अप्लाय करायचे आणि कंपनीचे टार्गेट कसे पूर्ण करायचे... अशा सततच्या प्रश्नांमुळे आजच्या तरुणांचा मेंदू पूर्णपणे थकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सकाळी उठल्याबरोबर फोनवर येणारे ५० नोटिफिकेशन्स, कॉलेज असाइनमेंटची निवड, दुपारच्या जेवणाचा मेन्यू, संध्याकाळी कोणत्या जॉबसाठी अप्लाय करायचे आणि कंपनीचे टार्गेट कसे पूर्ण करायचे... अशा सततच्या प्रश्नांमुळे आजच्या तरुणांचा मेंदू पूर्णपणे थकला आहे. सतत निर्णय घेण्याच्या या थकव्याला वैद्यकीय भाषेत ‘डिसीजन फटीग’ असे म्हटले जाते. शहरांमधील मनोरोग तज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ४० ते ५० टक्के तरुण याच समस्येने ग्रस्त आहेत. 

काय आहे ‘डिसीजन फटीग’?

‘डिसीजन फटीग’ ही एक मनोवैज्ञानिक स्थिती आहे. जेव्हा मेंदू कामाचे अनेक पर्याय हाताळताना थकून जातो, तेव्हा व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. अशा स्थितीत माणूस गोंधळलेला आणि चिडचिडा होतो. डॉक्टरांच्या मते, आता “काहीही ठरवण्याची हिंमत उरलेली नाही,” अशी तक्रार करणारे तरुण वाढत आहेत.

थकव्याची लक्षणे

- मेंदू जड वाटणे आणि विचार करण्यासाठी जास्त वेळ लागणे.- व्यक्ती महत्त्वाचे निर्णय घेणे टाळते किंवा छोटी कामे नंतरवर ढकलते.- घाईघाईत चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा निर्णय घेण्याचे टाळलेच जाते.- स्वतःवरचा विश्वास कमी होणे आणि स्वतःच्याच निर्णयांवर शंका घेणे.- निर्णय घेण्याची क्षमता शून्य होणे 

या गोष्टींची काळजी घ्या 

- हत्त्वाचे आणि कठीण निर्णय सकाळी घ्या, कारण त्यावेळी मानसिक ऊर्जा सर्वाधिक असते.- स्वतःसाठी एक निश्चित व हेल्दी रूटीन बनवा व त्याचे पालन करा. विविध गोष्टींमधील पर्याय मर्यादित ठेवा- दर ६० ते ९० मिनिटांच्या कामानंतर छोटा ब्रेक नक्की घ्या.- सतत स्क्रीन पाहणे किंवा काम करणे टाळा, मेंदूला विश्रांती द्या.- पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या, जेणेकरून मेंदूची कार्यक्षमता टिकून राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : Digital Lifestyle Threat: Impairs Young Adults' Decision-Making Ability Significantly

Web Summary : Digital overload causes 'Decision Fatigue' in youth, impacting choices and mental health. Constant notifications and decisions exhaust the brain, leading to impaired judgment, irritability, and avoidance. Prioritize sleep, healthy routines, and breaks to combat this fatigue and improve decision-making skills.
टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलdigitalडिजिटलHealthआरोग्य