शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:08 IST

Parents and Daughter Death: मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. तीन वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस होता, त्याच दिवशी तिचा आईवडिलांसह घरात मृतदेह आढळून आला.

Parents and Daughter Death: मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. तीन वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस होता, त्याच दिवशी आईवडिलांनी आधी तिची गळफास देऊन मारले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. 

तीन वर्षाच्या अद्विकाचा वाढदिवस होता. ती तीन वर्षांची झाली होती. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण काही क्षणातच संपूर्ण कुटुंब दुःखाच्या डोहात बुडाले. तीन वर्षाची अद्विका, तिचे वडील जतिंद्र कुमार (वय ३०) आणि आई मंजू (वय २८) या तिघांचेही घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाले. 

जतिंद्र कुमार हे रेल्वे मेल विभागात नोकरीला होते. ते कुटुंबासह हरयाणातील कुरुक्षेत्रमध्ये अलेल्या प्रेमनगर कॉलनीमध्ये राहत होते. सोमवारी (२० एप्रिल) पहाटे सहा वाजता सुभाष मंडी पोलिसांना कॉल आला की, प्रेमनगर कॉलनीतील एका घरात तीन लोकांनी फाशी घेतली आहे. 

घरातील दृश्य बघून पोलीस हादरले 

पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरात पती-पत्नी आणि तीन वर्षाच्या अद्विकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. ते दृश्य बघून पोलिसही हादरले. तिघांचे मृतदेह खाली उतरवण्यात आले आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. 

लेकीसह आईवडिलांनी जीवन का संपवले?

पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले की, तीन वर्षाच्या अद्विकाला गंभीर आजार होता. तिच्या आजारपणामुळे आईवडिल सतत चिंतेत राहत होते. तिच्या आजारामुळेच तणावाखाली असलेल्या आईवडिलांनी हा निर्णय घेतला आणि मुलीसह स्वतःचे आयुष्य संपवले. 

मयत जतिंद्र यांच्या बहिणीच्या सासऱ्याने सांगितले की, जतिंद्र कुमारने ही घटना घडण्यापूर्वी माझ्या मुलाला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. माझा मुलगा जीम ट्रेनर आहे आणि पहाटे पाच वाजताच त्याला मेसेज आला होता. मेसेज मिळताच तो घरी गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांवर आघात झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Parents kill daughter on birthday, commit suicide: Tragedy strikes family.

Web Summary : A heartbreaking incident occurred where parents killed their three-year-old daughter on her birthday before committing suicide in Haryana. The father, a railway employee, along with his wife, were found dead with their daughter. Police suspect the daughter's illness led to the tragic decision.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूPoliceपोलिस