शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस

By admin | Updated: October 27, 2014 00:11 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवार सकाळपासून ढग दाटून आल्याने शनिवारी दुपारुन आणि रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ रविवारी दिवसभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या़

लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवार सकाळपासून ढग दाटून आल्याने शनिवारी दुपारुन आणि रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ रविवारी दिवसभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या़ त्यातच अंगाला झोंबणारा गारवा असल्याने शहरातील वर्दळही ओसरली होती़ जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाच्या सरी दिवसभर अधूनमधून बरसत होत्या़ शनिवारपासून जिल्ह्यात ही परिस्थिती असून कडाक्याचा गारवा अंगाला झोंबणारा होता़लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, शिरुर अनंतपाळ, जळकोट, देवणी, चाकूर, लातूर तालुक्यात रविवारी रिमझिम पाऊस होता़ लक्ष्मी पूजनानंतर नभं दाटून आले़ शनिवारी पाऊस झाला नाही़ परंतु रविवारी दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून बरसत होत्या़ पावसाअभावी जिल्ह्यात रबीच्या पेरण्या अद्याप सुरु झाल्या नाहीत़ या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे़ मात्र मोठा पाऊस नसल्यामुळे ओल जमिनीत नाही़ त्यामुळे या पावसावर रबीच्या पेरण्या होणे शक्य नाही़ थोडा मोठा पाऊस झाल्यानंतर पेरण्यांना प्रारंभ होईल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले़ खरीपातील तुरीच्या पिकाला हा पाऊस दिलासादायक आहे़ पावसाळ्यातही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यामुळे खरीपाच्या पिकातील उतारा घटला आहे़ सोयाबीनचा उतारा गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमीच असून खरीप गेले़ रबीच्या पेरणीसाठी तरी पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आशादायक वातावरण असल्याने बळीराजा सुखावला आहे़ रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. परंतु, त्यात गारवा असल्याने रोगराईला निमंत्रणच आहे़ लातूर शहरात रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ वातावरणातला गारवा अंगाला झोंबणारा असल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्यच होते़ भाजी मार्केट, गंजगोलाईतील कापड बाजार, सराफा लाईन व नेहमी वर्दळ असलेल्या भागात रविवारी गारवा व रिमझिम पावसामुळे वर्दळ नव्हती़ यामुळे ऊबदार कपड्याच्या बाजारात मात्र तुरळक गर्दी दिसली़ (प्रतिनिधी)