सिग्नल तोडल्याने थांबवले म्हणून पोलिसांनाच मारहाण! उर्मट बाप-लेकांचा भरचौकात राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:38 IST2026-04-22T18:37:37+5:302026-04-22T18:38:55+5:30

हातात नोटा पकडून आक्षेपार्ह वक्तव्य, निलंबित करण्याच्या धमक्या, पोलिसांकडून तिघे ताब्यात

Police Assaulted in Chhatrapati Sambhajinagar Over Traffic Violation; Father and Two Sons Arrested | सिग्नल तोडल्याने थांबवले म्हणून पोलिसांनाच मारहाण! उर्मट बाप-लेकांचा भरचौकात राडा

सिग्नल तोडल्याने थांबवले म्हणून पोलिसांनाच मारहाण! उर्मट बाप-लेकांचा भरचौकात राडा

छत्रपती संभाजीनगर : सिग्नल ताेडल्याने थांबवून दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना उर्मट बाप -लेकांनी मारहाण केली. कॉलर पकडून पैसे दाखवत आक्षेपार्ह विधान करून त्यांना निलंबित करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली. भगवान महावीर चौकात घडलेल्या घटनेप्रकरणी पंकज नागोराव खंदरे, अक्षय पंकज खंदरे व योगेश पंकज खंदरे या तिघांना ताब्यात घेत पोलिसी पाहुणचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

छावणी वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक गोरे, अंमलदार योगेश चौधरी व अन्य सहकारी १८ एप्रिल रोजी भगवान महावीर चौकात कर्तव्य बजावत होते. रात्री ८ वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाकडून छावणीच्या दिशेने टेम्पो ट्रॅव्हलमधून जाणाऱ्या खंदरे पिता पुत्राने सिग्नल तोडले. त्यामुळे पोलिसांनी त्याची गाडी थांबवून बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, ऐन वर्दळीच्या वेळी त्यांनी भर चौकात गाडी उभी केली. 'तुम्ही फाइन कसा मारता', असे विचारत आरडाओरड करून शिवीगाळ केली. पोलिस त्यांना समजावून सांगत असताना, दोघांनी पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. मुलाने एका अंमलदारावर हात उगारला.

तिसऱ्या मुलाने राडा केला
हा वाद सुरू असतानाच पंकजने त्याच्या दुसऱ्या मुलाला बोलावून घेतले. त्यानेदेखील पोलिसांना मारहाण केली. पोलिसांना नोटा दाखवून महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करत निलंबित करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघा बाप-लेकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेऊन येथेच्छ पाहुणचार करण्यात आला. त्यानंतर चौधरी यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यात पंकजच्या एका मुलाचा जीम, तर दुसऱ्याचा पाण्याचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. छावणी पाेलिस अधिक तपास करत आहेत.

फेब्रुवारीपासून सहावा हल्ला
शहरात पोलिसांवर सातत्याने हल्ला, मारहाण होत आहे. फेब्रुवारीअखेर हायकोर्ट सिग्नलवर एका दाम्पत्याने पोलिसांवर हात उचलला होता. त्यानंतर सिडकोतही एका कुटुंबाने पोलिसांना मारहाण केली. गेल्या तीन महिन्यांतील पोलिसांवरील हल्ल्याची सहावी घटना असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title : सिग्नल पर रोकने पर पिता-पुत्रों ने पुलिस पर किया हमला!

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में, सिग्नल उल्लंघन के लिए रोकने पर एक पिता और उसके बेटों ने यातायात पुलिस पर हमला किया। शारीरिक हमले और धमकियों के बाद तीनों को गिरफ्तार कर लिया गया। फरवरी से शहर में पुलिस पर यह छठा हमला है, जिससे चिंता बढ़ रही है।

Web Title : Father and Sons Assault Police for Stopping Them at Signal!

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a father and his sons assaulted traffic police for stopping them for a signal violation. The trio was arrested after the incident, which involved physical assault and threats. This marks the sixth attack on police in the city since February, raising concerns.