"यंदा मेडिकलचे मेरिट वाढणार?" तज्ज्ञांकडून 'नीट'च्या सोप्या पेपरनंतर कट ऑफ वाढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:19 IST2026-05-04T14:14:39+5:302026-05-04T14:19:35+5:30

'नीट'चा पेपर सुटला, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद; फिजिक्स आणि केमिस्ट्रीने दिला दिलासा.

NEET 2026: "Will the merit of medical admission increase this year?" Experts hint at an increase in the cut-off after the easy paper of the NEET exam. | "यंदा मेडिकलचे मेरिट वाढणार?" तज्ज्ञांकडून 'नीट'च्या सोप्या पेपरनंतर कट ऑफ वाढण्याचे संकेत

"यंदा मेडिकलचे मेरिट वाढणार?" तज्ज्ञांकडून 'नीट'च्या सोप्या पेपरनंतर कट ऑफ वाढण्याचे संकेत

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) शहरातील ५० केंद्रावर सुरळीतपणे रविवारी (दि.३) पार पडली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या १७ हजार ३७४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ९८६ जणांनी परीक्षा दिली. ३८८ विद्यार्थी गैरहजर होते. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिलेल्या निर्धारित वेळेत केंद्रांमध्ये सोडण्यात आले. परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी काठीण्य पातळी सोपी असल्याची प्रतिक्रिया दिली. तज्ज्ञांनीही मागील वर्षीच्या तुलनेत पेपर सोपा असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

‘नीट’ परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातील ५० केंद्रांवर परीक्षेसाठी १७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मागील वर्षी परीक्षेच्या दरम्यान गोंधळाची परीस्थिती होती. त्यामुळे सगळ्याच केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला हाेता. विद्यार्थ्यांना केंद्रांवर सकाळी ११ वाजताचा रिर्पोटिग टाईम होता. त्यानुसार विद्यार्थी उपस्थित राहिले. केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे फेस रेकिगनेशन, थम घेऊनच प्रवेशपत्र व ओळखपत्रांची पडताळणी करत प्रवेश दिला. परीक्षा दिल्यानंतर केंद्राबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. पेपर सोपा गेल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली. सर्वाधिक अवघड वाटणारा फिजिक्सचा पेपर सोपा होता. त्याशिवाय केमिस्ट्रीही विद्यार्थ्यांना अवघड गेला नाही. बायलॉजी हा विषय तर विद्यार्थ्यांच्या आवडीचा असतो. मात्र, या विषयाचे प्रश्न वाचून उत्तर लिहिण्यासाठी वेळ लागल्याचेही काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

उन्हात गारवा शोधण्याचा प्रयत्न
अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांसाेबत त्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती. केंद्राबाहेर बसलेल्या पालकांसाठी काही केंद्राबाहेर पंडाल टाकण्यात आला होता तर अनेक पालकांनी परिसरातील झाडांचा आधार घेत उन्हात गारवा शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक पालकांनी पाल्य परीक्षा देऊन बाहेर येईपर्यंत केंद्राचा परिसर सोडला नव्हता. त्यामुळे अनेकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. अनेक केंद्रांच्या बाहेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पाणी बाटल्यांची शोधाशोध करताना काही पालक दिसले.

मागील वर्षीपेक्षा सोपा पेपर
मागील वर्षीच्या 66 तुलनेत यावर्षीचा पेपर सोपा होता. तिन्ही विषयांतील अनेक प्रॉब्लेम सहजपणे सोडविता आले आहेत. त्यामुळे चांगले मार्क मिळण्याची अपेक्षा आहे.
-निकिता लहाने, विद्यार्थिनी

बायोलॉजी सर्वांत सोपा
बायोलॉजी 66 विषयाचे प्रश्न सोपे होते. केमिस्ट्री आणि फिजिक्स विषयाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही मध्यम होती. हे प्रश्न सोडविताना अधिकचा वेळ लागला. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत पेपर सोपा गेला आहे.
-प्रतीक्षा मिरगे, विद्यार्थिनी

फिजिक्सही अपेक्षेपेक्षा सोपा
66 फिजिक्सच्या काठिण्य पातळी मध्यम होती. ज्या विद्यार्थ्यांनी कन्सेप्टनुसार अभ्यास केला, त्यांचे मार्क वाढणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यासाठी अधिकचा वेळ लागला. अनेक विद्यार्थी त्यांचे अनुभव सांगत आहेत. त्यावरून 'कटऑफ'चा अंदाज लावता येऊ शकतो.
- बी.एस. रेड्डी, फिजिक्स तज्ज्ञ

'नीट'चा पेपर मध्यम
२०२३ साली ज्या 66 पद्धतीचा पेपर होता, त्या प्रकारचा पेपर यावेळी आला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कटऑफ १०० मार्कानी जास्त राहण्याची शक्यता आहे. केमिस्ट्री विषयाचे प्रश्नही मध्यम स्वरूपाचे होते. मात्र, हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ लागला.
-प्रा. यशवंत चव्हाण, केमिस्ट्री तज्ज्ञ

Web Title : आसान NEET परीक्षा: इस साल मेडिकल प्रवेश कट-ऑफ बढ़ने की संभावना

Web Summary : 50 केंद्रों पर NEET परीक्षा सुचारू रूप से संपन्न हुई। विशेषज्ञों का अनुमान है कि आसान पेपर के कारण मेडिकल प्रवेश कट-ऑफ अधिक होगा। 16,986 छात्र उपस्थित हुए, भौतिकी को आसान माना गया। केंद्रों के बाहर गर्मी और पानी की कमी के कारण माता-पिता को चुनौतियों का सामना करना पड़ा।

Web Title : Easier NEET Exam: Medical Admission Cut-offs Likely to Rise This Year

Web Summary : NEET exam went smoothly across 50 centers. Experts predict higher medical admission cut-offs due to the easier paper. 16,986 students appeared, with physics deemed easier. Parents faced challenges due to heat and water scarcity outside centers.