शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: July 18, 2014 01:55 IST

औरंगाबाद : डीएमआयसी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा ते बिडकीन पट्ट्यात औद्योगिक वसाहतीसाठी ८०० कोटी रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा ते बिडकीन पट्ट्यात उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीसाठी ८०० कोटी रुपये खर्चाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी येथे वंदे मातरम् सभागृह आणि हज हाऊसच्या कामाचा कोनशिला समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री बाळासाहेब थोरात होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नसीम खान, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री फौजिया खान, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महापौर कला ओझा, आ. सुभाष झांबड, प्रदीप जैस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.वंदे मातरम् सभागृह आणि हज हाऊस या दोन्ही वास्तू येथे शेजारी शेजारी उभ्या राहत असून, हे देशासमोरील बंधुभावाचे उदाहरण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, औरंगाबादला संपन्न इतिहास आहे. तसेच बंधुभावाने राहण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही ऐतिहासिक वास्तू शेजारी शेजारी बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठवाड्यातील वंदे मातरम्चळवळीचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या लढ्याची आठवण म्हणून वंदे मातरम् सभागृह उभे केले जात आहे. त्याला लागूनच मराठवाड्यातील मुस्लिम बांधवांसाठी हज हाऊसची इमारत उभी राहणार आहे. हा बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. एकीचे प्रतीक म्हणून या वास्तू जतन केल्या पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मराठवाड्याच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद शहर वेगाने वाढत आहे. मराठवाड्याचे मागासलेपण कमी करण्याचे सामर्थ्य या शहरात आहे. त्यामुळे येथील औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी औरंगाबादचा समावेश डीएमआयसी प्रकल्पात केला आहे. डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा ते बिडकीन पट्ट्यात साडेदहा हजार हेक्टरवर मोठी औद्योगिक नगरी उभारण्यात येणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादनही झाले आहे. या औद्योगिक वसाहतीसाठी मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने आजच ८०० कोटी रुपयांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे, असे ते म्हणाले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी बहुचर्चित वंदे मातरम् सभागृह साकार होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. निजाम राजवटीत १९३८ मध्ये औरंगाबादेत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम् गीत गाऊ द्या’ या मागणीसाठी आंदोलन केले. अन्नत्यागही केला. येथून संपूर्ण मराठवाड्यात वंदे मातरम् चळवळ पोहोचली. या चळवळीचे स्मारक म्हणून १९८३ मध्ये राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हे सभागृह उभारण्याची घोषणा झाली. हे सभागृह आज मूर्त स्वरूपात येत आहे. त्यासाठी शासनाने २३.७५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही टोपे म्हणाले. नसीम खान म्हणाले की, नागपूरप्रमाणेच मराठवाड्यातील हज यात्रेकरूंसाठी औरंगाबादेत हज हाऊस उभारण्याची जुनी मागणी होती. मुख्यमंत्री चव्हाण यांनी ही मागणी मान्य केली. हज हाऊसच्या कामासाठी सरकारने ३० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाच्या नियुक्त्यांचा निर्णय लवकरचहज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृहाच्या पायाभरणी समारंभानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील विविध समित्या आणि महामंडळांवरील रखडलेल्या नियुक्त्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह हे संस्कृतीचे प्रतीक असून, त्यासाठी अनेकांचे परिश्रम कारणी लागल्याचेही ते म्हणाले.