सुरतहून येऊन छ. संभाजीनगरमध्ये घरफोडी! पोलिसांनी छोले-भटुरेच्या गाड्यावर काम करून आरोपींना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:15 IST2026-05-05T16:12:08+5:302026-05-05T16:15:52+5:30

सुरतहून येऊन छ. संभाजीनगरमध्ये घरफोडी! ७ गुन्हे उघड, पोलिसांनी छोले-भटुरेच्या गाड्यावर काम करून आरोपींना पकडले

Gujarat Gang Arrested for Daylight Burglaries in Chhatrapati Sambhajinagar; 7 Cases Solved | सुरतहून येऊन छ. संभाजीनगरमध्ये घरफोडी! पोलिसांनी छोले-भटुरेच्या गाड्यावर काम करून आरोपींना पकडले

सुरतहून येऊन छ. संभाजीनगरमध्ये घरफोडी! पोलिसांनी छोले-भटुरेच्या गाड्यावर काम करून आरोपींना पकडले

छत्रपती संभाजीनगर : गुजरात राज्यातील सुरतहून शहरात सकाळी पोहोचल्यानंतर स्थानिकची नंबरप्लेट लावून दिवसभर रेकी करीत बंद घरे फोडायचे. त्यानंतर, पुन्हा सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघून जायचे. या पद्धतीने पाच जणांच्या टोळीने शहरातील ७ घरे फोडली. या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला आहे. पाचपैकी दोन आरोपींना अटक केली असून, इतर तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

गुरुदास सुरेश कोळी (२८), अमोल गोकुळ जाधव (३३, दोघे रा.जोलवागाव, ता.पलसाना, जि.सुरत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याच वेळी मिलिंद संजय खैरनार, चंद्रकांत उर्फ बाबा पाटील, पाजी या तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये दिवसा फ्लॅट फोडण्याचे प्रकार प्रचंड वाढले होते. त्यात गत अनेक दिवसांपासून घरफोडीचे गुन्हे उघडकीस येत नव्हते. त्यामुळे गुन्हे शाखा आणि ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, साहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांनी गुन्हे शाखेला याबाबत बारकाईने तपासाच्या सूचना केल्या. त्यानंतर, कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजीत चिखलीकर, अंमलदार योगेश नवसारे, संजय गावंडे, विनोद परदेशी, राजाराम डाखुरे, सागर पांढरे, अमोल मुगळे, विजय घुगे यांच्या पथकाने अनेक सीसीटीव्ही तपासून या टोळीतील आरोपी निष्पन्न केले. अंमलदार नवसारे आणि प्रदीप दंडवते यांनी सुरतमध्ये १५ दिवस अंडा-भुर्जी, छोले-भटुरेच्या गाड्यावर काम करून आरोपी गुरुदास कोळी, अमोल जाधव यांची माहिती काढून त्यांना अटक केली होती.

७ घरफोड्या केल्याची कबुली
गुजरातच्या टोळीने शहरातील ७ घरे फोडल्याची कबुली दिली आहे. त्यात वेदांतनगर ठाण्यात दाखल ३, उस्मानपुऱ्यातील २, सातारा आणि छावणीचा प्रत्येकी १, अशा सात गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील ६८.५८ ग्रॅम सोन्याच्या लहान-मोठ्या १३ लगड जप्त केल्या, असे कल्याणकर यांनी सांगितले. ज्या घरात, अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही नाहीत तेथे ही टोळी हमखास घुसते. त्यामुळेच पोलिस आयुक्त पवार यांनी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : सूरत का गिरोह छत्रपति संभाजीनगर में सेंधमारी के बाद गिरफ्तार

Web Summary : गुजरात के सूरत का एक गिरोह छत्रपति संभाजीनगर में सात घरों में सेंधमारी करते हुए गिरफ्तार किया गया। पुलिस ने दो संदिग्धों को पकड़ने के लिए खाने के विक्रेताओं के रूप में काम किया; तीन अभी भी फरार हैं। चोरी का सोना बरामद किया गया।

Web Title : Surat Gang Busted in Chhatrapati Sambhajinagar After House Burglaries

Web Summary : A gang from Surat, Gujarat, was arrested in Chhatrapati Sambhajinagar for burglarizing seven homes. Police posed as food vendors to nab two suspects; three remain at large. Stolen gold was recovered.