शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महावितरणने ५ एमव्हीएचे रोहित्र बसविले

By admin | Updated: November 20, 2014 00:46 IST

तीर्थपुरी : येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र जळाल्याने ११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे डाव्या कालव्याला पाणी असून

तीर्थपुरी : येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र जळाल्याने ११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे डाव्या कालव्याला पाणी असून घेता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. याबाबत ‘लोकमत’ च्या १७ नोव्हेंबर रोजी हॅलो जालनाच्या अंकातील वृत्ताची दखल घेत १९ रोजी रोहित्र बसविण्याचे काम सुरू झाले. गुरुवारी शेतीसाठी वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे वीज वितरणचे उपअभियंता गुंजारगे यांनी सांगितले.तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी रात्री जळाल्याने तीर्थपुरी, कंडारी, मुरमा, भायगव्हाण, खालापुरी, बाचेगाव, शेवता, खा. हिवरा, जोगलादेवी, रामसगाव, रूई या गावाचा शेतीचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद केला होता. केवळ तीर्थपुरी, भायगव्हाण जिनिंग हाच गावठाणचा वीजपुरवठा दुसऱ्या ५ एमव्हीएवरून सुरू होता.दरम्यान, या गावाला जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरून अनेकांनी कर्ज काढून पाईपलाईन केलेली असताना व डाव्या कालव्याला पाणी पाळी चालू असताना केवळ वीज पुरवठा बंद असल्याने पिकांना ते देता येत नव्हते. यामुळे शेतकरी हैराण झाले होते. लोकमतने या प्रश्नावर वाचा फोडली आणि लगेच तातडीने ५ एमव्हीएचा रोहित्र बसवला. १९ रोजी तो पूर्ण बसवून चार्ज करण्याचे काम एक दिवस चालणार असून, २० रोजी रात्री वरील ११ गावातील शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)