पणन संचालनालयाने काही अटी लागू करून चंद्रपूर जिल्ह्यात बैल बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीच्या सभापतींना दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बैलबाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
२४ एप्रिल २०२० रोजी मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव येथून वन विभागाने चार महिन्याचा मादी बछडा ताब्यात घेतला होता. जंगलातून भरकटल्यानंतर ताब्यात घेतलेल्या वाघाच्या बछड्याला कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून सुरूवातीला घशाचे नमुनेहीे तपासण्याचा प्रयत्न झाला हो ...
अमृत योजनेसाठी निधी मिळताच कामे सुरू झाली. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम काही काळासाठी बंद होते. त्यामुळे योजनेला विलंब होत गेला. आता २३ मार्चपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. याचा फायदा घेत मनपाने श ...
चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूड ...
कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विव ...
जंगलातून भरकटलेल्या बछड्याला त्याच्या आईकडे स्वाधीन करण्यापूर्वी त्या वनक्षेत्रात संचार करणाऱ्या दोन वाघिणींचे डिएनए नमुने वन विभागाने हैदराबाद येथीलसीसीएमबी प्रयोग शाळेत पाठविले होते. ४० दिवसानंतर मंगळवारी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून टी-२ ही वा ...
७ हजार मिलीयन टन कोळसा ब्लॉक खासगी व्यक्तींना देऊन कोल इंडियाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप राजुरा येथे पत्रकार परिषदेत अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे महामंत्री सुधीर घरडे यांनी केला. ...
शासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांच्या बँक खात्यातील अखर्चित रकमा शासन खाती जमा न केल्यास मे २०२० पासूनचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे नुकतेच काढले. यामुळे राज्यातील बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या लाखो घटकांना फटका बसला आहे. ...
रोहिणी नक्षत्र सुरू झाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल धुळ पेरणीकडे असतो. अती उष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शिवाय शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवेही शेतजमिनीवरील बियाणे खाऊन फस्त करतात. अशावेळी दुबारपेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येते. ...