उन्हाळ्यातील विवाह सोहळे दिवाळीत उरकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:48+5:30

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले.

Summer wedding ceremonies will end on Diwali | उन्हाळ्यातील विवाह सोहळे दिवाळीत उरकणार

उन्हाळ्यातील विवाह सोहळे दिवाळीत उरकणार

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचे विघ्न : धुमधडाक्यातील सोहळ्यांना मुरड, नागभीड तालुक्यात विवाहाकरिता ८५ अर्ज

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी यंदा विवाह सोहळ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला होता. नागरिकांच्या मागणीवरून ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली. मात्र, धुमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांनी उन्हाळ्यात जुळलेले विवाह पुढे ढकलून दिवाळीत करण्याचा बेत आखला आहे. दरवर्षी तालुक्यात हजारो विवाह पार पडायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे आतापर्यंत विवाह परवानगीसाठी केवळ ८५ अर्ज आले. त्यापैकी ७५ विवाह पार पडले आहेत.
शहरी भागात वर्षभर केव्हाही विवाह करण्याची पंरपरा आहे. शहरातील बहुतांश विवाह हे तिथीनुसार नाही तर मंगल कार्यालयाच्या उपलब्ध तारखेनुसार होत असतात. ग्रामीण भागाची संस्कृती वेगळी असल्याने मार्च, एप्रिल व मे महिन्यातच होत असतात. या काळात शेतीची कामे नसतात. जून महिना सुरू झाल्यानंतर डिसेंबर^^-जानेवारी महिन्यापर्यंत शेतीच्या कामातून वेळ मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात विवाह सोहळे उन्हाळ्यातच उरकून घेण्याला प्राधान्य दिले जाते. यावर्षीही याच तयारीने अनेकांनी लग्न जुळवून घेतले. अनेकांचे जुळवून घेणे सुरू असतानाच कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला असला तरी तो लवकरच संपेल व लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात विवाह पार पाडू, या आशेवर अनेकांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. मात्र लॉकडाऊनचा वाढतच असल्याने विवाहोत्सुकांच्या आशेवर पाणी फेरतच राहिले. अशा परिस्थितीत किती दिवस वाट पाहायचे म्हणून काही जणांनी शासनाच्या नियमांना अधिन राहून विवाह पाडू, अशी हमी देणारे अर्ज सादर करण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत विवाहाची परवानगी मागणारे ८५ अर्ज तहसील कार्यालयात प्राप्त झाले. यातील ७५ अर्जदारांच्या विवाहांना परवानगी देण्यात आली असून १० अर्जदारांची परवानगी शिल्लक आहे.

परवानगी अत्यावश्यक
नागभीड तालुक्यात मार्च ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हजारो विवाह पार पडत असतात. दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ३० ते ४० विवाह होतात. मात्र यावर्षी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दीला मनाई करण्यात आली. तहसील कार्यालयात विहित नुमन्यात अर्ज व कागदपत्रे सादर केल्यास तहसीलदाराकडून विवाहाला परवानगी दिली जाते.

आतापर्यंत ७५ विवाहासाठी परवानगी देण्यात आली आहे. १० अर्ज शिल्लक आहेत. विवाह सोहळ्यात गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- मनोहर चव्हाण,
तहसीलदार नागभीड.
 

Web Title: Summer wedding ceremonies will end on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न