शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवारांसह तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:43 IST

Chandrapur : राजुरा - सुभाष धोटे, चिमूर - सतीश वारजूकर, तीन जागांचा तिढा

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाविकास आघाडीतील काँग्रेसने ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ब्रह्मपुरीतून काँग्रेसचे हेवीवेट नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राजुरातून सुभाष धोटे तिसऱ्यांदा तर चिमुरातून डॉ. सतीश वारजूकर हे दुसऱ्यांदा आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. विशेष म्हणजे, चिमुरात सलग दुसऱ्यांदा कीर्तीकुमार भांगडिया आणि डॉ. सतीश वारजूकर यांच्यात लढत बघायला मिळणार आहे. राजुऱ्यात सुभाष धोटे आणि स्वभापचे अॅड. वामनराव चटप पुन्हा आमने-सामने असतील. येथे भाजप कोणाला उमेदवारी देते, याकडे लक्ष लागले आहे. बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोराचा तिढा कायम आहे. 

वडेट्टीवारांचे स्वकर्तृत्वावर राजकारणात वेगळे स्थानब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्याची औपचारिकता तेवढी शिल्लक होती. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिंदेसेना वा भाजप यापैकी कोणत्या पक्षाकडे ही जागा जाते, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. दमदार आणि विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून वडेट्टीवारांची ओळख आहे. वडेट्टीवारांनी स्वकर्तृत्वावर राजकारणात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जमिनीवर पाय आणि सामान्यांच्या जवळ असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.

मागील दहा वर्षांच्या काळात ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर आणण्यात त्याचा मोठा वाटा आहे. या मतदारसंघात त्यांच्या काळात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. सतत जनसंपर्कात राहून जनतेच्या मदतीला धावून जात असल्यामुळे ते लोकनेता म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या रूपाने काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तगडा उमेदवार दिला आहे. आता त्यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूरrajura-acराजुराchimur-acचिमूर