शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

"दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय निराशाजनक; मंत्र्याच्या हट्टामुळे दारूबंदी रद्द"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 18:14 IST

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्रयापूर्वी चंद्रपुरातली दारूबंदी घेण्यात आली होती मागे

सेवाग्राम (वर्धा) : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतली आहे. हा निर्णय निराशाजनक असल्याच्या आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविले आहे."दारूबंदीमुळे गुन्हेगारी व अवैध दारूची विक्री वाढते असा जावई शोध चंद्रपूरचे पालकमंत्री यांनी लावला आहे. त्याच पद्धतीचा अहवाल तथाकथित समितीकडून करून आणला. या निर्णयाच्या संदर्भात फेरविचार करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन केले होते. ५८८ ग्रामपंचायतींनी तसे ठराव मंजूरही केले आहेत. जिल्हा परिषदेने एकमताने दारूबंदीसाठी ठराव केला. जिल्ह्यातील विचारवंत व विधायक कार्यकर्ते व विविध संस्था तसेच संघटनांनी संयुक्तपणे दारूबंदीची मागणी केली. याच कारणांनी सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर जिह्यात दारूबंदी लागू झाली," असं त्या पत्रात नमूद केलं आहे."पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने महसुलासाठी व एका मंत्र्याचा हट्ट पुरविण्यासाठीच दारूबंदी रद्द केली. ही बाब अयोग्य असून लाखो महिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी असल्याचे पत्रकात नमूद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी आंदोलन झाले‌. पदयात्रा काढण्यात आल्या. चर्चासत्र झाले. त्या सर्व आंदोलनाचा व लोकभावनांचा हा अपमान आहे. सरकार दारूबंदीच्या अंमलबजावणीत असफल ठरले आहे. त्या अपयशाची परिणती बंदी उठविण्यात आली. त्याबाबत फेरविचार करावा," अशी मागणीही पत्रातून महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, मंत्री मधुकर शिरसाट, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, प्रवक्ता रमेश दाणे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरे