शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पेंच कालव्याचे पाणी परिसरात मिळत नाही. जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने उन्हाळ्यात जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ठाणा, परसोडी, शहापूर, नांदोरा, खरबी, निहारवानी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे अनेकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेकांकडे बोरवेलची सुविधा नाही. अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नहराची नोंद आहे.

ठळक मुद्देठाणा येथील प्रकार : नाल्यावर बंधारा नाही, बांधकाम करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गावरील ठाणा पेट्रोलपंपलगत असणाऱ्या महामार्गालगत वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधकाम अनेक वर्षापासून झाले नसल्याने हजारो शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आजही बंधारा बांधकाम प्रतीक्षेत आहे.
पावसाळ्यातील संततधार पावसाचे पाणी तसेच पेंच नहराचे पाणी येथील सांड नाल्यातून कोरंभीमार्गे वैनगंगा नदीला जावून मिळते. याच नाल्यावरून राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक सुरू आहे. हा पूल ब्रिटीकालीन कालखंडातील आहे. नाल्याद्वारे वाहनारे पाणी बंधारा बांधकाम करुन थांबविल्यास परिसरातील जलसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे नाल्यावर शंभर फुट लांब व १५ फुट रूंद सिमेंट बंधारा बांधून परिसरातील शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना दिलासा देण्याची गरज आहे. ठाणा परिसरात अनेक विहिरींना उन्हाळ्यात पाणी राहत नाही. ठाणा परिसरातील ५०० हेक्टर शेतीला यामुळे कायमस्वरूपी सिंचनाची सोय होवू शकते.
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पेंच कालव्याचे पाणी परिसरात मिळत नाही. जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने उन्हाळ्यात जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ठाणा, परसोडी, शहापूर, नांदोरा, खरबी, निहारवानी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे अनेकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेकांकडे बोरवेलची सुविधा नाही. अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नहराची नोंद आहे. मात्र उपकालवे अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही. ठाणा शहापूर मार्गावरील स्मशानभूमीजवळच जुना ब्रिटीशकालीन पूल आहे. त्यामुळे शहापूर परिसरातील कोरडवाहू शेतीसाठी येथे बंधारा बांधल्यास लाखो क्युसेक पाण्याचा साठा होईल. परिसरात अनेक शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने परिसरात भाजीपाला पिकांची शेती करता येत नाही.
शहापूर, ठाणा ग्रामपंचायतला पाणीपुरवठा होण्यास मदत होवू शकते. स्थानिक परिसरात रोजगाराच्या संधी कमी असल्याने नाल्यावर बंधारा बांधकाम करण्याची गरज आहे. कोरोना संकटामुळे अनेकांच्या हाताला काम नसून यामुळे अनेकांना यामुळे रोजगार उपलब्ध होवू शकतो. कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यास अनेक जण मत्स्यव्यवसाय तसेच शेती आधारित व्यवसाय उभारू शकतात. येथून वाहणाऱ्या नाल्यावर नव्याने बंधारा बांधकामाची मागणी ठाणा व शहापूरवासीयांसह शमा मेश्राम, बबन बावनकुळे, मनोहर देशमुख, बादल मेहर, निखिल तिजारे, विषू पिंपळशेंडे यांनी केली आहे.

लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज
भंडारा तालुक्यातील अनेक गावात आजही सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. शहापूर मंडळ अंतर्गत असणाऱ्या विविध गावातील शेतकरी आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षीच शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेचा फटका सहन करावा लागत आहे. शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना चांगल दिवस येतील.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती