शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरानंतर करडी परिसरात बरसला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे  सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे.

ठळक मुद्देकोमेजलेल्या पराह्यना जीवनदान : रोवणीसाठी मुसळधार पावसाची गरज


युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : अपुऱ्या पावसामुळे करडी परिसरातील पाच हजार हेक्टर शेती रोवणीविना पडीत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सुरु केलेली रोवणी रखडलेली आहेत. त्यातच आठ तास विजेच्या पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त असतानाच आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. कोमेजलेल्या पराह्यना जीवनदान मिळाले. परंतु कडक उन्हाने तापलेल्या शेतीला रोवणीसाठी आणखी मुसळधार पावसाची गरज आहे.
मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी थाटात खरीप हंगामाचा प्रारंभ केला. धडाक्यात धानाची पेरणी केली. आद्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हुरूप आला. आता पेरण्या आटोपून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. धानाची पऱ्हे रोवणीसाठी सज्ज आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांबरोबर कोरडवाहू शेतीचे पऱ्हे  सुद्धा जोमदार आहेत. परंतु मागील दोन आठवड्यापासून पावसाचा लपंडाव सुरु आहे. उन सावल्यांच्या खेळात शेतकरी भरडला आहे. आता आठवड्याच्या तपानंतर पावसाचे आगमन झाले. परंतु अजूनही तापलेल्या शेतीची भूक शमलेली नाही. रोवणीसाठी पर्याप्त पाण्याचा साठा शेतात झालेला नाही. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. शेतकरी वाचला पाहिजे ही भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे.

विजेने वाढविली समस्या
जिल्ह्यात आठ तासाची वीज शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करणारी आहे. कडक उन्हात शेतीला सिंचन करण्याची क्षमता आठ तासाच्या विजेत नाही. त्यातच वारंवारच्या लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांना फक्त सात तासाची वीज मिळत आहे. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शेतीचे बजेट बिघडले आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा विजेच्या समस्येने आणखी ग्रासले आहे.

कृषी सेवा केंद्रांचा काळाबाजार
मोहाडी तालुक्यात खत व कीटकनाशकांच्या काळाबाजाराला उधाण आले आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पहिल्या धाडीत करडी परिसरातील १० कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले होते. कृषी सेवा केंद्रानी शेतकºयांना अधिक भाव खत व कीटकनाशके विकणे, बिल न देणे आदी प्रमुख कारणांसह कारवाई केली होती. परंतु अजूनही ही समस्या सुटलेली नाही. शेतकºयांची पिळवणूक सुरुच आहे.

टॅग्स :Rainपाऊस