शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नावरून परत येताना काळाने घातली झडप! नवरदेवाच्या मामा-मामीसह पाच जण ठार, वऱ्हाड्यांच्या व्हॅनचा भयंकर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:07 IST

Bhandara Accident News Marathi: भंडारा जिल्ह्यात लग्नावरून परतणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात पाच जण ठार झाले. इतर काही नातेवाईक जखमी झाले आहेत. 

Bhandara Accident: पवनी तालुक्यातील अड्याळ या गावालगत लग्नाचे वन्हाड घेऊन परतणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झाला. यात पाचजण ठार, तर चारजण जखमी झाले. ही घटना महामार्गावर गुरुवारी (२३ एप्रिल) रात्री ९:४५ वाजताच्या दरम्यान घडली. हा अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. 

श्वेता पुरुषोत्तम नगरे (वय १६, अड्याळ), प्रभाकर चाचरकर (४८, वेलतूर, जि. नागपूर) व त्यांची पत्नी मुन्नी प्रभाकर चाचरकर (४३, वेलतूर) तसेच नयना देवराम नगरे (१८), दुर्गा देवराम नगरे (४२, अड्याळ) या मायलेकींसह नवरदेवाच्या मामा-मामीचाही या अपघातमध्ये मृत्यू झाला. 

जखमी चालक सोहम जागेश्वर गेडाम (२५, पिंपळगाव) आणि नवरदेवाचा मित्र उमेश बोधनलाल सोनवणे (२४, खैरलांजी, म.प्र.) यांना अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून रक्षा खेडकर (२०, अड्याळ) आणि स्नेहा गिरीधर नान्हे (१८, अड्याळ) यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, अड्याळ येथील बसस्टँड परिसरात राहणारे सुदर्शन नान्हे यांचे लग्न गुरुवारी अड्याळपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कोंढा येथील एका चर्चमध्ये होते. 

बुधवारी अड्याळमध्ये आनंदात हळदीचा कार्यक्रम झाला. कोंढा येथे गोरज मुहूर्तावर असलेले लग्न आटोपल्यावर रात्री वहऱ्हाडी एका व्हॅनने (एमएच ३६/ झेड ०८६१) अड्याळला निघाले. वऱ्हाड्यांची पहिली खेप पोहोचवून दुसरी खेप आणत असतानाच अगदी गावालगतच्या सहाय्यतानगर परिसराजवळच हा अपघात घडला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅन आणि एका मोठ्या १० चाकी ट्रकची (सीजी ०८ / एडब्ल्यू ६६३५) समोरासमोर धडक बसल्याने हा भीषण अपघात घडला. 

अपघाताच्या आवाजाने नागरिक घाबरले

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेऊ बचावकार्य सुरू केले. पोलिसही घटनास्थळ दाखल झाले. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्या घेतले असून चालका नाव कळू शकले नाही.

या अपघाताचे वृत्त कोंढा येथील लग्नसमारंभस्थळी पोहोचताच एकच कल्लोळ उडाला. रात्री नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी आणि पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wedding party van crash kills five, including groom's relatives.

Web Summary : A horrific van accident near Adyal claimed five lives, including the groom's aunt and uncle. The wedding party was returning when the van collided head-on with a truck. Four others were injured and hospitalized. Police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस