पौष पौर्णिमा २०२६: आजची रात्र भाग्याची! फक्त पाणी आणि अक्षता वापरून करा 'हा' इच्छापूर्ती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:34 IST2026-01-03T13:31:23+5:302026-01-03T13:34:55+5:30
Paush Purnima 2026: ३ जानेवारीच्या रात्री खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राकडे बघून करा 'हा' सोपा उपाय; २०२६ मध्ये तुमची प्रत्येक अपूर्ण इच्छा होईल पूर्ण!

पौष पौर्णिमा २०२६: आजची रात्र भाग्याची! फक्त पाणी आणि अक्षता वापरून करा 'हा' इच्छापूर्ती उपाय
आज शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी पौष पौर्णिमा(Paush Purnima 2026) आहे. नवीन वर्षातील ही पहिलीच पौर्णिमा अत्यंत फलदायी मानली जाते. जर तुमची काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील किंवा अनेक दिवसांपासून एखादे महत्त्वाचे काम रेंगाळले असेल, तर ज्योतिष अभ्यासक भावना उपाध्याय यांनी सांगितलेला हा 'चंद्र-शिव' उपाय तुमच्यासाठी भाग्योदयाची गुरुकिल्ली ठरू शकतो.
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
इच्छापूर्तीसाठी काय करायचे?
हा उपाय आज रात्री, जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र दिसेल, तेव्हा करायचा आहे.
१. योग्य जागा निवडा: घराची खिडकी, गॅलरी, टेरेस किंवा अंगण अशा ठिकाणी जा, जिथून तुम्हाला पूर्ण चंद्राचे दर्शन होईल.
२. साहित्य: एका स्वच्छ भांड्यात (शक्य असल्यास तांब्याच्या किंवा चांदीच्या) पाणी घ्या. त्या पाण्यात तांदळाचे काही अखंड दाणे (अक्षता) टाका. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत.
३. मंत्र जप: चंद्राच्या प्रकाशात बसून डोळे मिटा आणि 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा (एक माळ) शांतपणे जप करा.
४. संकल्प आणि प्रार्थना: जप पूर्ण झाल्यावर महादेवाला आणि चंद्रदेवाला मनापासून प्रार्थना करा - "हे ईश्वरा, २०२६ या वर्षात माझी अडलेली सर्व कामे मार्गी लाव, माझ्या राहिलेल्या इच्छा आणि अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ मला दे."
५. जल अर्पण: प्रार्थना संपल्यानंतर ते अक्षतायुक्त पाणी घरातील कोणत्याही झाडाला किंवा कुंडीत अर्पण करा. (तुळशीच्या कुंडीत टाकू नये, इतर कोणत्याही झाडाला चालेल)
या उपायामागचे शास्त्र
पौष पौर्णिमेचा चंद्र हा सर्वात तेजस्वी असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि महादेव हे चंद्राला डोक्यावर धारण करणारे 'चंद्रशेखर' आहेत. तांदूळ आणि पाणी हे चंद्राचे प्रतीक आहेत. जेव्हा आपण 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करतो, तेव्हा पाण्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे जल वृक्षाला अर्पण केल्याने आपली इच्छा निसर्गाच्या माध्यमातून ब्रह्मांडापर्यंत पोहोचते.
याचे फळ
>> मानसिक शांतता लाभते आणि आत्मविश्वास वाढतो.
>> रखडलेली कामे विनासायास पूर्ण होऊ लागतात.
>> नवीन वर्षात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतात. पाहा हा व्हिडिओ -
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब