शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:08 IST

Jyeshtha Purnima 2025 Puja Vidhi, Shubh Muhurat: १०-११ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा विभागून आली आहे, तरी वटपूजन १० तारखेला आणि ११ तारखेला पुढे दिल्यानुसार लक्ष्मीपूजन करायचे आहे.

यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा(Jyeshtha Purnima 2025) दोन दिवसात विभागून आली आहे. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी १० जून रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जून रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी संपेल. मात्र व्रताचरणासाठी १० जून रोजी सकाळी ६. ३३ ते १०. २१ हा शुभ मुहूर्त दिला आहे. पौर्णिमा तिथी चंद्राशी संबंधित असल्यामुळे पूजेसाठी १० जून ही तारीख ग्राह्य धरली जाईल आणि ही तिथी ११ जूनचा सूर्योदय पाहणार असल्याने दान धर्म तसेच लक्ष्मी पूजेसाठी निश्चित केली जाईल. 

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जातेच, शिवाय पौर्णिमेच्या तिथीनिमित्त लक्ष्मी पूजा आणि अन्य उपायही केले जाते. हे उपाय ज्योतिष शास्त्रात दिले आहेत. दर पौर्णिमेला हे उपाय केले असता त्याचा अधिक लाभ होतो. हे उपाय केल्यास धन आणि सौभाग्य वाढण्यास फायदा होऊ शकतो. या उपायांबद्दल जाणून घेऊया.

या दिवशी पूजेबरोबरच पुढील उपाय करा-

>> देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पौर्णिमेला लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. यासोबतच संध्याकाळी दिव्याचे दान करणे शुभ राहील.

>> पौर्णिमेला चंद्रदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी एका भांड्यात पाणी, दूध आणि थोडे तांदूळ एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.

>> जर पती-पत्नीमध्ये काही वाद झाला तर पौर्णिमेच्या वेळी दोघे मिळून चंद्रदेवाला अर्घ्य देतात. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

>> कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मी पूजेसह कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यानंतर मातेचा आशीर्वाद घेऊन लाल कपड्यात गोवऱ्या बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्यात.

>> धन आणि अन्न वाढीसाठी देवीच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. नारळ हे लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते. म्हणून त्याला आपण श्रीफळ असे म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी. नारळ अर्पण केल्यानेदेखील लक्ष्मी माता प्रसन्न होते. 

>> याशिवाय पौर्णिमेच्या निमित्ताने गोर गरिबांना यथाशक्ती दान, गोमातेची पूजा, मूक प्राणी पक्ष्यांना दाणा पाणी ठेवा, त्यायोगेही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वरद हस्त प्राप्त होईल. 

टॅग्स :Vat Purnimaवटपौर्णिमाAstrologyफलज्योतिषPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणMONEYपैसा