Astro Tip: अनामिक भीती वाटतेय? टेन्शन आलंय? 'हा' चमत्कारिक मंत्र देईल इन्स्टंट रिझल्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:57 IST2026-02-19T10:55:01+5:302026-02-19T10:57:07+5:30
Astro Tip: मन अस्वस्थ करणाऱ्या घटना सभोवताली घडतात, पण कधी कधी अनामिक भीतीही सतावते, अस्वस्थ वाटते, यावर हा पॉवरफुल मंत्र ठरेल रामबाण उपाय!

Astro Tip: अनामिक भीती वाटतेय? टेन्शन आलंय? 'हा' चमत्कारिक मंत्र देईल इन्स्टंट रिझल्ट!
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण, उद्याची चिंता आणि एक प्रकारची 'अनामिक भीती' आपल्याला सतत सतावत असते. अनेकदा सर्व काही सुरळीत असूनही मनाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. यावर अष्टभैरवांपैकी एक असलेल्या 'बटुक भैरव' यांची उपासना हा एक अमोघ उपाय असल्याचे ज्योतिषी शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कोण आहेत बटुक भैरव?
भैरवांची अनेक रूपे आहेत, त्यातील 'बटुक भैरव' हे त्यांचे सात्त्विक आणि बालरूप मानले जाते. 'बटुक' म्हणजे बालक. ज्याप्रमाणे एखाद्या बालकाच्या सहवासात आपल्याला सुरक्षित आणि आनंदी वाटते, तसेच बटुक भैरवांची उपासना भक्ताला भयमुक्त करणारी आणि संरक्षण देणारी ठरते.
स्वामी समर्थ तारक मंत्र: संकल्पाची 'ही' पद्धत बदलू शकते तुमचे संपूर्ण आयुष्य; गुरुवारी करा सुरुवात!
मंत्राचा प्रभाव आणि फायदे
"ओम बटुक भैरवाय नमः" या मंत्राचा जप केल्यास खालील सकारात्मक बदल जाणवतात:
अनामिक भीती दूर होते: मनात बसलेली भीती, रात्री येणारी वाईट स्वप्ने किंवा सततची चिंता या मंत्राच्या प्रभावाने दूर होते.
आत्मविश्वास वाढतो: ज्या व्यक्तींना लोकांसमोर बोलताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना भीती वाटते, त्यांच्यात हा मंत्र एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करतो.
मन:शांती: या मंत्राचा केवळ ५ ते १० मिनिटे शांतपणे जप केल्यास मन कमालीचे शांत होते आणि विचारांची गर्दी थांबते.
नकारात्मक ऊर्जेचा नाश: घरातील किंवा कामाच्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे.
जप कसा करावा?
१. एका शांत ठिकाणी पाठीचा कणा ताठ ठेवून बसा.
२. डोळे मिटून तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
३. आता पूर्ण श्रद्धेने 'ओम बटुक भैरवाय नमः' या मंत्राचा लयबद्ध जप सुरू करा.
४. जप करताना बटुक भैरवांचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा.
तुम्ही 'हाय व्हायब्रेशन' व्यक्ती आहात की 'एनर्जी ड्रेनर'? स्वतःची ऊर्जा ओळखण्याची सोपी पद्धत!
ज्योतिषी सल्ला
शिरीष कुलकर्णी सुचवतात की, जेव्हा जेव्हा तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल किंवा एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जायचे असेल, तेव्हा हा मंत्र म्हणजे तुमच्यासाठी एक 'इंस्टंट एनर्जी बूस्टर' ठरेल. पाहा त्यांचा व्हिडीओ -