धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:08 IST2026-05-14T13:59:06+5:302026-05-14T14:08:06+5:30

जत तालुक्यातील खलाटी परिसरात आनंदा बिरु शेजुळ यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. काल सायंकाळी झालेल्या वादळामुळे शेजुळ यांच्या घरावरील पत्रे उडून गेले.

Shocking! Heavy rains lashed Sangli 8-month-old baby dies after wall collapses | धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारा आणि पावसाने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, खलाटी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

जत तालुक्यातील खलाटी परिसरात आनंदा बिरु शेजुळ यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. काल सायंकाळी झालेल्या वादळामुळे शेजुळ यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. यावेळी घराची भिंत अचानक कोसळली. दुर्दैवाने, या भिंतीखाली दबले गेल्याने श्रीवर्धन शेजुळ या अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला.

मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला

परिसरात हळहळ

श्रीवर्धनच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच खलाटी आणि जत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, परिसरातील द्राक्ष बागांच्या शेडवरील पत्रे आणि घरांवरील छपरे कागदासारखी उडून गेली. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच बाधित शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title : सांगली में त्रासदी: तूफान ने 8 महीने के बच्चे की जान ले ली

Web Summary : सांगली के जत तालुका में आए विनाशकारी तूफान से भारी नुकसान हुआ। खलाटी में तूफान के कारण दीवार गिरने से 8 महीने के एक बच्चे की दुखद मौत हो गई। कई घर और खेत भी बुरी तरह प्रभावित हुए, जिससे निवासी शोक में हैं और सरकारी सहायता की मांग कर रहे हैं।

Web Title : Tragedy in Sangli: Storm Claims 8-Month-Old Child's Life

Web Summary : A devastating storm in Sangli's Jat taluka caused widespread damage. An 8-month-old child tragically died after a wall collapsed in Khalati due to the storm. Many homes and farms were also severely affected, leaving residents in mourning and seeking government assistance.