रायपूरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पण या धावांचा बचाव करण्यात ते कमी पडले. या सामन्यातील पराभवामुळे शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघावर आता प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. प्रीती झिंटाच्यापंजाब किंग्सवरही अशीच वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षणातील ढिसाळ कामगिरीमुळे या दोन्ही संघांची अवस्था "तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." अशी झाली आहे. पंजाब किंग्सचा संघ अजूनही स्वबळावर प्लेऑफ्स गाठू शकतो. पण उर्वरित सामन्यांत चुका सुधारल्या नाहीत, तर पंजाबलाही मोठा फटका बसू शकतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'कॅचेस विन मॅचेस' ही गोष्ट विसरले अन् गणित बिघडले
धावांचा बचाव करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिल्या ८ षटकात दोन झेल सोडले. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात कार्तिक त्यागीने दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीच्या विकेटची संधी निर्माण केली. पण रोव्हमन पॉवेल याला त्या संधीच सोनं करता आले नाही. विराट कोहलीनं याचा पुरेपूर फायदा उठवत विक्रमी शतक झळकावले आणि कॅचसह कोलकाताच्या हातून सामना निसटला. कॅमरून ग्रीन घेऊन आलेल्या आठव्या षटकातही वैभव अरोरानं रजत पाटीदारचा सोपा झेल सोडला. या दोन चुकांची किंमत कोलकाता नाईट रायडर्सला पराभवासह चुकवावी लागली. एवढेच नाही तर आता स्पर्धेत टिकणंही त्यांच्यासाठी आव्हानात्मक झालं आहे.
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
प्रीतीच्या संघाचा कहर; सलग चार सामन्यात चुकांवर चुका
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सच्या संघाने यंदाच्या हंगामात पहिल्या ७ सामन्यात ६ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १३ गुणांची कमाई करत दिमाखदार सुरुवात केली. पण मागील चार सामन्यात क्षेत्ररक्षकांनी पुन्हा पुन्हा त्याच चुका केल्यामुळे संघ अडचणीत सापडला आहे. पंजाब किंग्सच्या संघाने १० सामन्यात १६ झेल सोडले आहेत. क्षेत्ररक्षणात ढिसाळ कामगिरी करण्यात शशांक सिंह अव्वलस्थानी असून कूपर कॉलॉनी आणि लॉकी फर्ग्युसन यांनीही यात भर घालण्याचे काम केले आहे. पंजाब किंग्च्या संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने खराब क्षेत्ररक्षणाला संघातील 'व्हायरस' असल्याचे संबोधले आहे. आता उर्वरित ३ सामन्यांपैकी किमान दोन सामने जिंकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. क्षेत्ररक्षणात झेल सोडण्याच्या चुका टाळल्या नाही तर त्यांच्यावरही स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावू शकते.