शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

"संघर्ष पाचवीलाच पूजलेला"; पंकजा मुंडेंची मोठी घोषणा,"लवकरच मी तुमच्यापर्यंत येणार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 18:38 IST

पंकजा मुंडे दिल्लीकडे रवाना, परत येताच काढणार आभार दौरा

परळी (बीड) : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार पंकजा मुंडे यांची आज सकाळी परळी येथे अनेक कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी कार्यकर्ते भाऊक झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी, लोकसभा निवडणुकीत ज्यांनी प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतले, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम केले त्यासर्वांचे आभार मानले. दरम्यान, पंकजा मुंडे आज परळीहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. तेथून थेट नवी दिल्लीत जात भाजपाच्या बैठकीत त्या सामील होणार आहेत. 

संपूर्ण राज्यात बीड लोकसभेचा निकाल धक्कादायक लागला. सर्वात चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या ( शरद पवार) बजरंग सोनवणे यांनी अत्यंत कमी मतांनी पराभव केला. निकालानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी मतदार आणि समर्थकांसाठी आज भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात सोशल मिडियावर एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्वांचे आणि मतदारांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, ''माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, माझ्यासाठी नवस बोलले, माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल सर्वांचे आभार. त्या ६ लाख ७७ हजार मतदारांचेही मनापासून आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला मतदान केलं. अत्यंत टफ फाईट अत्यंत विपरित परिस्थितीत मी देऊ शकले ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर''

पुढच्या आठवड्यात काढणार आभार दौरापंकजा मुंडे आज मुंबईकडे आणि त्यानंतर पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यानंतर १२ किंवा १५ तारखेपासून आभार दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. ''तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी! संघर्ष हा आपल्या जीवनात पाचवीला पूजला आहे. या संघर्षात न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मला खूप खूप अभिमान वाटतो.'' असंही पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४