By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 18:03 IST
1 / 10एप्रिल महिन्याची सांगता होऊन आता मे महिना सुरू होत आहे. ३० एप्रिल रोजी बुध मेष राशीत प्रवेश करत आहे. या राशीत सूर्य विराजमान असून, बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. तसेच नीचभंग, धनयोग जुळून येत आहे. चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ राशीतून होणार आहे.2 / 10मंगळ आणि चंद्राचा समसप्तक योग जुळून येणार आहे. तसेच शुक्राचा विपरीत योग जुळून येणार आहे. तसेच या आगामी कालावधीत मोहिनी एकादशी, बुध प्रदोष, श्री नृसिंह जयंती असून, ०१ मे रोजी बुद्धपौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती आहे. तसेच कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती आहे. 3 / 10ग्रहांचे गोचर आणि एकूण ग्रहमान पाहता, एप्रिल महिन्याची सांगता आणि मे महिन्याची सुरुवात अनेक राशींना चांगली ठरू शकते, असे म्हटले जात आहे. 4 / 10वृषभ: कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. काही सकारात्मक बातमी मिळू शकते. विचारपूर्वक घेतलेला निर्णय जीवनात आनंद आणि समृद्धी आणू शकेल. खर्च बराच वाढू शकतो. प्रेम जीवनात एका नव्या सुरुवातीची शक्यता आहे. जीवनात शांतता आणि आनंद मिळू शकेल.5 / 10मिथुन: अनेक क्षेत्रांमध्ये फायदे शक्य आहेत. सुख-सोयी आणि सुविधांसह आलिशान जीवनाचा आनंद घेऊ शकता. आर्थिक परिस्थितीही चांगली राहील. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल. परंतु, आर्थिक खर्च वाढू शकतो, म्हणून बजेट आणि खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रवास, चैनीच्या वस्तू, आणि भेटवस्तूंवर अधिक पैसे खर्च होऊ शकतात. व्हिसा, प्रवास, आयात-निर्यात इत्यादी परराष्ट्र व्यवहारांमध्ये प्रगती दिसून येईल. यामुळे मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे.6 / 10कर्क: कार्यक्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. आर्थिक बाबी सामान्य राहतील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अंतर्ज्ञानाचा वापर करा. कामासंबंधित असो वा वैयक्तिक कारणांसाठीचा प्रवास यशस्वी होऊ शकेल. 7 / 10कन्या: हा काळ खूप अनुकूल असेल. धनवृद्धीची अनेक चिन्हे दिसतील, ज्याचे फायदे भविष्यात मिळतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबातील महिलांना पाठिंबा मिळेल. जीवनात शांतता आणि आनंद नांदेल. करिअर आणि प्रेमजीवन हळूहळू सुधारेल.8 / 10तूळ: अचानक आर्थिक लाभ होण्याची प्रबळ चिन्हे आहेत. अडकलेला पैसा, सरकारी निधी किंवा गुंतवणूक परत मिळू शकते. कला, विमा, विपणन किंवा जोखीम-संबंधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना अनपेक्षित लाभ मिळू शकतो. पैसे मिळण्याची आशा सोडली असेल, तर ते यावेळी परत मिळू शकतात. कुटुंबात काही मतभेद किंवा दुरावा असेल, तर तो कमी होऊन सलोखा वाढू शकेल. व्यक्तिमत्त्वही सुधारेल, अधिक आकर्षक होईल. बोलणे अधिक मधुर होईल. प्रयत्नांमध्ये यश मिळवणे शक्य होईल.9 / 10धनु: नोकरी, व्यवसाय आणि उत्पन्न या सर्वांवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. परदेशातून आर्थिक लाभ, नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. कठीण परिस्थितीचे संधींमध्ये रूपांतर करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. शत्रूही कमजोर होऊ शकतात. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ सकारात्मक आहे.10 / 10- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.