बहीण-भाऊजीच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह गोदावरीत फेकला, मुलाकडून शंकेने वाचा फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:07 IST2026-05-04T19:05:23+5:302026-05-04T19:07:55+5:30

"तीन दिवस उसाच्या शेतात होता मृतदेह!" वास सुटल्याने गोणीत भरून शहागडच्या पुलावरून गोदावरीत फेकला; तिघे आरोपी गजाआड.

Husband murdered with the help of sister-in-law; Body thrown into Godavari, son expresses suspicion | बहीण-भाऊजीच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह गोदावरीत फेकला, मुलाकडून शंकेने वाचा फुटली

बहीण-भाऊजीच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह गोदावरीत फेकला, मुलाकडून शंकेने वाचा फुटली

गेवराई (जि. बीड) : त्रास देत असलेल्या पतीचा बहिणीच्या गावी बहीण व भाऊजीच्या मदतीने गळा दाबून खून केला. तीन दिवसांनंतर मृतदेह शहागडच्या गोदावरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पती हरविल्याची तक्रार पुण्याच्या सिंहगड पोलिस ठाण्यात देऊन बनाव केला. शेवटी चौकशीसाठी पुणे पोलिस गेवराईत आले. मुलाने आपल्या वडिलांचा घातपात झाला असावा, अशी शंका व्यक्त केल्यानंतर खुनाला वाचा फुटली. गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे आठ महिन्यांआधी घडलेली खुनाची घटना समोर आली आहे. पोलिसांनी संशयित पत्नी, तिची बहीण व भाऊजी यांना बेड्या ठोकल्या आहेत.

गेवराईच्या संजयनगरातील उद्धव तुकाराम शिंदे (वय ५०) हे पुण्यात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. पत्नी संगीता शिंदे (वय ४६) यांच्याशी त्यांचे नेहमी वाद होत होते. यातून उद्धव नेहमी संगीताला मारहाण करत असे. ६ सप्टेंबर २०२५ रोजी दोघे पुण्याहून दुचाकीने गेवराई तालुक्यातील पांढरवाडीत संगीताची बहीण सविता वाजे (४८) व साडू विष्णू वाजे (वय ५५) यांना भेटण्यासाठी आले. पती नेहमीच मारहाण करत असल्याचे संगीताने दोघांना सांगितले. दररोजच्या मारहाणीला कंटाळून तिघांनी उद्धवच्या खुनाचा कट रचला. एका रात्री बहीण व भाऊजीच्या मदतीने संगीताने पतीचा गळा आवळून खून केला. विष्णूने त्याच्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह पांढरवाडीतील उसाच्या शेतात टाकून दिला. परंतु तीन दिवसांनी वास सुटल्याने मृतदेह गोणीत भरून दुचाकीवरून शहागड येथे जाऊन जुन्या पुलावरून गोदावरी नदीत टाकून दिला. त्यानंतर दोन दिवसांनी दुचाकीही गोदावरीत टाकून दिली.

पती मिसिंगची तक्रार देऊन बनाव
संगीताने पुण्याच्या सिंहगड पोलिसांत पती हरविल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून २ मे २०२६ रोजी पुणे आयुक्तालयातील एक पोलिस अंमलदार व उद्धवचा मुलगा शुभम असे दोघे गेवराई ठाण्यात आले. माझ्या वडिलांचे काही बरेवाईट झाले आहे, अशी शंका शुभमने गेवराई पोलिसांसमोर व्यक्त केली. पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. 

तिघे अटकेत, गोदावरीत दुचाकीचा सांगाडा सापडला
पोलिसांनी पांढरवाडीत जाऊन विष्णू, सविता, उद्धवची पत्नी संगीता अशा तिघांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी खुनाचा गुन्हा कबूल केला. शुभम याच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोदावरी नदीत फेकलेल्या मोटारसायकलचा सांगाडा पोलिसांना मिळून आला आहे.

आठ महिन्यांत गुन्हा उघडकीस
आठ महिन्यांच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात सपोनि. संतोष जंजाळ, सपोनि. अण्णासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप आढाव, पोलिस उपनिरीक्षक संजय उदगीरकर, सुरेश पारधी, इसाक शेख, राजू भिसे, कल्याण राठोड, राजेंद्र राऊत, चंद्रसेन माळी, सुंदर राठोड, गोरक्ष डोके, धीरज खांडेकर, जितेंद्र ओव्हाळ, दिनेश ढाकणे, महादेव कदम, रेखा तुपे, रेशमा पौळे यांना यश आले. याप्रकरणी अधिक तपास सपोनि. दीपक लंके करत आहेत.

Web Title : पत्नी ने रिश्तेदारों संग मिलकर पति को मारा, शव नदी में फेंका

Web Summary : पत्नी ने लगातार दुर्व्यवहार से तंग आकर अपनी बहन और बहनोई की मदद से पति की हत्या कर दी। उन्होंने शव को नदी में फेंक दिया, गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज कराई, लेकिन बेटे के संदेह से गिरफ्तारी हो गई।

Web Title : Wife Kills Husband with Kin's Help, Body Dumped in River

Web Summary : A woman, with her sister and brother-in-law's assistance, murdered her husband due to constant abuse. They dumped the body in a river, staged a missing person report, but suspicion arose from their son, leading to their arrest.