शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

Maruti-Tata बघतच राहिले! या 6 लाख रुपयांच्या कारची ग्राहकांना भुरळ, कंपनीच्या विक्रीत 1486% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:49 IST

महत्वाचे म्हणजे, या स्वस्त कारच्या माध्यमाने सिट्रॉनने थेट टाटा आणि मारुतीलाच टक्कर दिली आहे.

कार कंपन्यांसाठी नोव्हेंबर महिना जबरदस्त ठरला आहे. या महिन्यात कंपन्यांच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाल्याचे दिसून आले. मारुती सुझुकीपासून ते Hyundai, टाटा मोटर्स, स्कोडा आणि एमजी मोटर इंडिया सारख्या कंपन्यांच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. मारुती सुझुकीने 20.7%, Hyundai ने 29.7% आणि Kia Motors ने 69.0% टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तसेच, वार्षिक आधारावर Skoda ची बिक्री 101.9% वाढली आहे. मात्र, एका कंपनीने या सर्वच कंपन्यांना मागे टाकत आपल्या विक्रीत तब्बल 1486 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

या कंपनीने सर्वच कंपन्यांना टाकले मागे - आपण ज्या कंपनीसंदर्भात बोलत आहोत त्या कंपनीचे नाव आहे सिट्रॉन. फ्रन्सची कार निर्माता कंपनी Citroen ही भारतात एन्ट्री करणाऱ्या नव्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सध्या भारतीय बाजारपेठ समजून घेत आहे. भारतामध्ये Citroen केवळ Citroën C5 Aircross आणि Citroen C3. या दोनच कारची विक्री करत आहे. पण या दोनच कारच्या बळावर कंनीने अभूतपूर्व वाढ नोंदविली आहे.

एका कारने केली कमाल - या कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण 825 कार विकल्या आहेत. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये केवळ 52 कार विकल्या होत्या. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत आता, कंपनीच्या विक्रीत तब्बल 1486.5% टक्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या या विक्रीत सर्वात मोठा वाटा आहे, Citroen C3 चा. नोव्हेंबर महिन्यात C3 हॅचबॅकच्या 804 युनिट्सची विक्री झाली. तर ऑक्टोबरमध्ये 1180 युनिट्स, सप्टेंबरमध्ये 1354 युनिट्स आणि ऑगस्टमध्ये 825 युनिट्सची विक्री झाली होती.

महत्वाचे म्हणजे, या स्वस्त कारच्या माध्यमाने सिट्रॉनने थेट टाटा आणि मारुतीलाच टक्कर दिली आहे. हिची किंमत 5.88 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.15 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारचा सामना थेट Maruti Wagon R, Celerio, Tata Punch आणि Tata Tiago सारख्या कारसोबत असतो.

टॅग्स :carकारCitroen Indiaसिट्रॉनAutomobileवाहन