शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

१० व ११ रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 8:31 PM

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.नैऋत्य (उत्तर)दिशेकडून मोसमी वारे दक्षिणेकडे वाहिल्यास संथ गतीने पाऊस पडतो. तेव्हाच झडसदृश स्थिती राहते. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे दक्षिणेकडून मोसमी वारे ५ ते ६ किमी उंचीवरून वाहू लागल्याने कुठे धो-धो तर कुठे काहीच नाही, अशी स्थिती उदभवत आहे. त्यामुळे यंदा झडसदृश स्थिती अनुभवता आली नाही, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली.ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. सद्यस्थितीत अरबी समुद्र, गुजरात व मध्यप्रदेशवर कमी दाबाचा पट्टा असल्याने तेथे संथपणे पाऊस कोसळत आहे.

सध्या अरबी समुद्रातून नैरूत्य मोसमी वारे सशक्तपणे वाहत असून हा प्रवाह आनखी ४८ तास टिकणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १० व ११ ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.१० ते १२ ऑगस्ट दरम्यान विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास ७० टक्के भागात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भात मात्र अतिवृष्टीच्या इशाºयासह १५ ऑगस्टपर्यंत विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता बंड यांनी वर्तविली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस