शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:38 IST

Ravi Rana On Uddhav Thackeray : आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

Ravi Rana On Uddhav Thackeray  ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी समोर येणार आहेत. या पार्श्वभमीवर काल एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. धक्कादायक निकाल लागणार असल्याचे अंदाज देण्यात आले आहेत. एनडीए देशात पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचे अंदाज देण्यात आले आहेत. दरम्यान, आता या एक्झिट पोलवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा

"उद्धव ठाकरे निकालानंतर २० दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा आमदार   रवी राणा यांनी केला आहे. "एक्झिट पोलचे आकडे आज आले आहेत. ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याच दिवशी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे त्याच दिवशी आम्हाला निकाल माहित होता. म्हणून नवनीत राणा २ लाखांनी निवडून येणार हा आमचा दावा आहे, असंही रवी राणा म्हणाले. 

"निवडणुकीच्या निकालानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणार, मोदीजींनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे त्या खिडकीतून उद्धव ठाकरे येतील. मोदीजींनी आधीच सांगितलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासाठी बाळासाहेब यांचे सुपूत्र म्हणून माझी नेहमी त्यांच्यासाठी एक खिडकी उघडी आहे. मी दाव्याने सांगतो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वीस दिवसातच उद्धव ठाकरे सरकारमध्ये दिसतील, कारण येणारा काळच देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीजी आहेत हे उद्धव ठाकरे यांना माहित आहे, असा मोठा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला. 

'नवनीत राणा २ लाख मतांनी येणार'

आमदार रवी राणा यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा दावा केला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून यावेळी नवनीत राणा यांनी लोकसभा लढवली. यावेळी तिरंगी लढत झाली. दरम्यान या मतदारसंघात निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा दोन लाख मताधिक्क्याने निवडून येतील असा दावा केला आहे.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४