1 / 9अभिनेते नाना पाटेकर यांनी नागपूरमध्ये आयोजित केलेल्या जलक्रांती परिषदेत नाम फाऊंडेशनच्या कामाचं कौतुक करताना 'नटसम्राट' सिनेमाबद्दल भाष्य केलं. त्यांनी 'नटसम्राट'बद्दल केलेलं वक्तव्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2 / 9नाना म्हणाले, 'एखादी भूमिका जिवंत करण्यासाठी त्यात पूर्ण जीव ओतावा लागतो. 'नटसम्राट' या नाटकामध्ये अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारणं ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत थकवणारी आणि आव्हानात्मक बाब आहे'. 3 / 9'नटसम्राट'साठी मला विचारलं तेव्हा मी सांगितलं होतं की मी सिनेमा करेन, पण नाटक करणार नाही. नाटक करत असताना प्रत्येकवेळी त्यात जीव ओतायचा'. 4 / 9'मला वाटतं की, १०, १५ किंवा २५ प्रयोगांनंतर मी मेलो असतो. डॉ. लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त या सगळ्यांनीच नटसम्राट केलं. ज्यांनी ज्यांनी नाटक केलं, ते सगळे हॉर्ट अटॅकने गेले'. 5 / 9'नाटकाच्या प्रत्येक प्रयोगात जीव ओतल्याशिवाय प्रेक्षकांना तो आनंद देताच येत नाही. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले यांसारख्या दिग्गजांनी हे नाटक केलं आणि प्रत्येक प्रयोगात आपला जीव ओतला'. 6 / 9'या भूमिकेची तीव्रता एवढी प्रचंड आहे की, कलाकाराच्या हृदयावर त्याचा मोठा ताण येतो'. 7 / 9'म्हणूनच मी हे नाटक करायला स्पष्ट नकार दिला होता आणि पुढं जाऊन नाटक न करता फक्त सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला.'8 / 9'मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता. डॉ. लागू, दत्ता भट्ट त्यामुळे आम्ही केलंय ते एवढसं आहे'. 9 / 9'तुम्ही त्यांनी केलेलं ओरिजनल दुर्दैवानं पाहिलं नाही, काही मंडळींना बघायला मिळालं असेल... पण ते काय काम करायचे बापरे...', असंही नाना पाटेकर पुढे म्हणाले.