शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

'ते' घर सुरक्षित ठेवू शकत नाही, तर मतदारसंघ कसा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:25 IST

Amravati : मोर्शीत भाजपचे उमेश यावलकर यांच्यावर प्रश्नचिन्ह; भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात एकमात्र महायुतीत मोर्शी मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. ही मैत्रीपूर्ण लढत भाजपचे चंदू यावलकर आणि अजित पवार गटाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे.

त्यातच चंदू यावलकर यांचे मोठे बंधू संजय यावलकर हे 'तुतारी'च्या बाजूने उभे झाल्यामुळे भाजपचा हार्टबीट वाढलेला आहे. तर दुसरीकडे 'ते' घर सुरक्षित ठेवू शकत नाही, ते मोर्शी मतदारसंघ कसा सांभाळणार? अशी चर्चा आता मतदारांमध्ये रंगू लागली आहे. 

भाजपचे उमेदवार चंदू यावलकर म्हणजे तोंडात साखर अशी त्यांची ओळख आहे. पण राजकीय स्वार्थासाठी ते कोणाचाही गेम करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही, अशी त्यांची दुसरी बाजू आहे. गत काही वर्षापूर्वी मोर्शी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजू काळे यांचे आस्कमिक निधन झाले होते. त्यामुळे राजू काळे यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून आणण्याचा सर्वपक्षीय निर्णय त्यावेळी झाला होता. माळी समाजातून दुसरे कोणीही निवडणूक लढणार नाही, असे ठरले होते. मात्र चंदू यावलकर यांनी या सर्वपक्षीय निर्णयाला छेद देत स्वतः नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत राजू काळे यांच्या पत्नीला पराभवाला सामोरे जावे लागले आणि चंदू यावलकर हे विजयी झाले होते. चंदू यावलकर यांचा हा स्वार्थी डाव आजही मोर्शीकरांच्या हृदयावर घाव करून आहे. त्यामुळे 'आगे आगे देखो होता है क्या'? या प्रतीक्षेत मतदार आहे. 

यावलकर बंधू म्हणजे 'दुश्मन न करें चंदू यावलकर आणि संजय यावलकर हे दोघे भाऊ आहेत. मात्र या दोघांमध्ये अबोला असून विस्तवही जात नाही, अशी माहिती आहे. म्हणूनच संजय यावलकर यांनी तुतारी'च्या व्यासपीठावर हजेरी लावून मतदारांना 'मेसेज' दिला, है विशेष, संजय यावलकर यांनी यापूर्वी मोशींचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. ते कट्टर शिवसैनिक आहे. संजय यावलकर यांनी यापूर्वी विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या बॅनरखाली लढवली होती. अवघ्या १३०० मतांनी संजय यावलकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी हर्षवर्धन देशमुख हे निवडून आले होते. आता लहान बंधू चंदू यावलकर भाजपचे उमेदवार असताना मात्र संजय यावलकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मोर्शी मतदारसंघात यावलकर बंधू म्हणजे दुश्मन न करे..., असे बोलले जात आहे. 

मैत्रीपूर्ण लढतीत कोणाचा होणार 'गेम'? मोर्शी मतदारसंघात महायुतीत भाजपचे चंदू यावलकर आणि अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. भाजपा उमेदवारांच्या प्रचारातून राष्ट्रवादी अजित पवार यांचे चिन्ह आणि फोटो गायब तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बॅनर पोस्टर वरून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहे. मात्र जाहीरनामा एकच, योजना एक परंतु प्रचार वेगळा अशी अवस्था आहे. विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यशैलीवर मतदारांची प्रचंड नाराजी आहे. एकंदरीत पक्षीय राजकारणाला जनता वैतागली असून यंदा मोर्शी विधानसभा निवडणुकीत कोणाचा गेम होणार हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती