शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

मोठे नुकसान, शेतकरी हळहळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:01 IST

पाऊस तसा शेतकऱ्यांच्या आवडीचा. यावेळी मात्र तो सतत बरसत राहिला. इतका की शेत खरडून गेले, पिके सडून गेली, भाजीपाला नष्ट झाला. पीक उत्तम आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये यावेळी आनंद संचारलेला बघता आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र आहे. तो संततधार असल्यामुळे शेतात तळे साचल्याचे चित्रही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र दिसले. नेहमीप्रमाणे ऐन तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावला. तात्काळ पंचनाम्यांची गरज आहे.

ठळक मुद्देडोळ्यातही पाणी : पिकांना संजीवनी देणारा पाऊसच मरणयातना देऊन गेला

तो बरसला; पण हिंम्मत देण्याऐवजी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून गेलाअमरावती : पाऊस तसा शेतकऱ्यांच्या आवडीचा. यावेळी मात्र तो सतत बरसत राहिला. इतका की शेत खरडून गेले, पिके सडून गेली, भाजीपाला नष्ट झाला. पीक उत्तम आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये यावेळी आनंद संचारलेला बघता आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र आहे. तो संततधार असल्यामुळे शेतात तळे साचल्याचे चित्रही कमीअधिक प्रमाणात सर्वत्र दिसले. नेहमीप्रमाणे ऐन तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिरावला. तात्काळ पंचनाम्यांची गरज आहे. तालुक्यांमध्ये भेदभाव न करता जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करवून घेतले तर शंतकºयांना थोडीतरी मदत मिळू शकेल.नदी काठावरील शेती पुराने खरडल्यालोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आल्याने नमस्कारी, फत्तेपुर, वरखेड, तारखेड, कौडण्यपूर, शिदवाडी, इसापूर, चांदुर ढोरे, धामंत्री व धारवाडा या गावांतील नदी काठावरील काही शेतीत पुराचे पाणी शिरले. शेतजमीनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे शेत जमिनी खरडून गेल्या आहेत.शनिवारी रात्री उशिरा अप्पर वर्धा धरणाचे गेट बंद केल्याने वर्धा नदीचा पूर कमी झाला. मात्र नदी काठावरील शेतीत पुराचे पाणी शिरले असल्याने शेती खरडून गेल्या. प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नायगावची १५० हेक्टर शेती पाण्याखालीलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : चार दिवसांपासून बगाजी सागर धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीकाठावरील दीडशे हेक्टरपेक्षा अधिक जमीन पाण्याखाली गेली. सर्वाधिक फटका हा नायगाव येथील शेतकऱ्यांना बसला. या शेताचे अद्यापही सर्वेक्षण झालेले नाही.वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे नायगाव, दिघी महल्ले, सोनोरा काकडे, गोकुसरा, आष्टा, विटाळा गावातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. नायगाव येथील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतीही वर्धा नदीच्या काठी आहे. महापुरामुळे शेतकऱ्यांची जमीन पूर्णता खरडून गेली आहे. त्यामुळे आमच्या शेतीचे सर्वेक्षण करून मोबदला द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी उमेश शिसोदे, पराग शिसोदे, देवेन्द्र शिसोदे, अमित शिसोदे, रोशन बोंद्रे, सतिष ढेमरें, नामदेव राऊत, प्रमोद शेलार, रवी मोरे, गुलाब महात्मे, विनोद गोरडे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर