शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अल्प मनुष्यबळावर शहर पोलिसांची गुन्हेगारांशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

गुन्हेेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापक बळ असणे आवश्यक असताना, मर्यादित बळावर पोलीस यंत्रणा गुन्हेगारांशी झुंज देत आहे. दहा पोलीस ठाण्यासह सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा व डझनभर अन्य शाखांमध्ये केवळ १७८२ पोलीस कर्मचारी आहेत. तर, उपायुक्तांसह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरिक्षकांची पदे देखील रिक्त आहेत. 

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराचा ‘क्राईम रेट’ राज्यात ‘टाॅप’वर असताना देखील स्थानिक पोलीस प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावर गुन्हेगारांशी दोन हात करावे लागत आहेत. शहराची लोकसंख्या १० लाखांच्या आसपास पोहोचली असताना मनुष्यबळ मात्र, ‘जैसे थे ’च आहे. गुन्हेेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापक बळ असणे आवश्यक असताना, मर्यादित बळावर पोलीस यंत्रणा गुन्हेगारांशी झुंज देत आहे. दहा पोलीस ठाण्यासह सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा व डझनभर अन्य शाखांमध्ये केवळ १७८२ पोलीस कर्मचारी आहेत. तर, उपायुक्तांसह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरिक्षकांची पदे देखील रिक्त आहेत. राज्य गुन्हे अन्वेशन  विभागातर्फे सन २०१९ मध्ये राज्यातील ४८ पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस अधीक्षक या घटकांमधील फौजदारी गुन्ह्याचा दर जाहीर करण्यात आला. दर १ लाख लोकसंख्या हे प्रमाण घेऊन हा क्राईम रेट काढण्यात आला. या ४८ पोलीस घटकांमध्ये  अमरावती शहराचा क्राईम रेट ५७०.२२ असा आहे. असे असतानादेखील केवळ १७८२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कारभार हाकावा लागत आहे. ही वस्तुस्थिती पोलीस महासंचालकांच्या दालनातदेखील पोहोचविण्यात आली आहे. शहरातील गाडगेनगर, फ्रेजरपुरा व राजापेठ पोलीस ठाण्याचे विभाजन पदनिर्मितीचा प्रस्ताव रखडला आहे.

४२०० जणांविरूद्ध प्रतिबंधक कारवाई ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ४२०० जणांविरूद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. ती २०२० च्या तुलनेत तब्बल ८०० नी अधिक आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या कार्यकाळात खूनाचा प्रयत्न, दंगा यात घट झाली. आर्म ॲक्ट, अंमली पदार्थ तडीपार, एमएपीडीए, अवैध धंद्यासह प्रतिबंधक कार्यवाहीत मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी