शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:53 IST

देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी: साईबाबा श्री संस्थानच्या तदर्थ समितीने सुधारित देणगी धोरणास मान्यता दिली आहे. यानुसार देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे. मोठ्या देणग्यांकरिता तहहयात व्हीव्हीआयपी दर्शनाबरोबरच वस्त्र अर्पणाच्या संधी देखील मिळणार आहेत, असे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

१०,००० ते २४,९९९ रुपये: ५ सदस्यांसाठी एक वेळचा आरती पास, ५ उदी प्रसाद पॅकेट्स व १ लाडू प्रसाद.

२५,००० ते ५०,००० रुपये: दोन वेळा आरती/दर्शन पास, ३ डी पॉकेट फोटो, ५ उदी, १ साई चरित्र, २ लाडू प्रसाद.

५०,००१ ते ९९,९९९ रुपये: २ व्हीव्हीआयपी आरती पास, सन्मानचिन्हे, ५ उदी, साई सतचरित्र, २ लाडू प्रसाद.

१ लाख ते ९.९९ लाख रुपये: पहिल्या वर्षी २ व पुढील वर्षांसाठी प्रत्येकी १ व्हीव्हीआयपी पास, एक वेळचे वर्षातून मोफत दर्शन, सन्मान शॉल, ३ फोटो, पूजेचे कूपन, भोजन पास, वस्त्र व प्रसाद भेट.

१० लाख ते ५० लाख रुपये: प्रत्येक वर्षी २ व्हीव्हीआयपी आरती पास, वर्षातून एक वेळ मोफत प्रोटोकॉल दर्शन, साईबाबांना वस्त्र अर्पणाची संधी, वस्त्र भेट, साई मूर्ती, पूजेचे कूपन्स, भोजन पास.

५० लाखांहून अधिक : आयुष्यभर दरवर्षी ३ व्हीव्हीआयपी आरती, दोन प्रोटोकॉल दर्शन पास, वस्त्र अर्पण, साई मूर्ती, सन्मान चिन्हे, भोजन पास.

अंबाबाई, जोतिबा दर्शनासाठी ड्रेसकोड

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तोकडे कपडे घालून येण्यास मनाई केली आहे. महिला मुलींना अंगप्रदर्शन होईल असे शॉर्ट स्कर्ट, पाश्चिमात्य कपडे, तसेच पुरुषांनादेखील बर्म्युडा, थ्री फोर्थ असे कपडे घालून या दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी येता येणार नाही. 

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी