शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:28 IST

या महिलेने हैदराबादमध्ये ७५ लाखांचा सोनेरी मुकुट साकारला. या मुकुटाचे डिझाइनही याच महिलेनेच काढले.

Shirdi Sai Baba: एका कुटुंबाने साईबाबांना तब्बल ७५ लाख रुपयांचा (७८८. ४४ ग्रॅम) सुवर्ण मुकुट अर्पण केला. शनिवारी रात्री या भाविक दाम्पत्याने मुकुट अर्पण करत आपली संकल्पपूर्ती केली. आंध्र प्रदेशातील भाविक कुटुंब दोन वर्षापूर्वी दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी यातील गृहिणी असलेल्या महिलेने साईबाबांच्या समाधीसमोर संकल्प केला होता. 'मी पुढच्या वेळी सुवर्ण मुकुट घेऊनच तुमच्या दर्शनाला येईन.' असा तो संकल्प होता. जाताना त्या महिलेने मुकुटाचे वजन आणि मापही घेतले होते. त्यावेळी महिला इंग्लंडला नोकरीला होती. असे असले तरी परिस्थिती बेताची होती, मात्र स्वप्न मोठे होते, असे या महिलेने माध्यमांना सांगितले.

या महिलेने हैदराबादमध्ये ७५ लाखांचा सोनेरी मुकुट साकारला. या मुकुटाचे डिझाइनही याच महिलेनेच काढले. शनिवारी रात्री जेव्हा हा मुकुट साईच्या मूर्तीवर चढवला जात होता, तेव्हा त्या भाविक दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते. साई सस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या भावूक क्षणाचे साक्षीदार होत या कुटुंबाचा सत्कार केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्णूपंत थोरात, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. ओळख गुप्त ठेवण्याची विनंतीदाम्पत्याने आपली ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. ही कथा केवळ एका मुकुटाची नाही, तर एका अतूट श्रद्धेची, एका महिलेच्या निश्चयाची आणि साईबाबांच्या अगाध कृपेची आहे, असे त्या भाविक असलेल्या महिलेने सांगितले.

टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर