शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने झोडपले, बाभूळगावमध्ये गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरात मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अवकाळी पावसास सुरुवात झाली. याच वेळी बाभूळगाव, नेरसह, वणी, मारेगाव, कळंब तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यातील गणोरी, आलेगाव, अंतरगाव, दिघी, मुस्ताबाद, वाटखेड, नायगाव, कृष्णापूर, नागरगाव, पंंचगव्हाण, चिमनापूर, पिंपरी इजारा, इंदिरानगर, नांदुरा खुर्द, मालापूर या गावात अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे नुकसान केले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टबन्समुळे मंगळवारी सायंकाळी यवतमाळसह बाभूळगाव, कळंब, नेर, दिग्रस, पुसद या तालुक्यांत अवकाळी  पाऊस कोसळला. बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून यामुळे हरभरासह तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ शहरात मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अवकाळी पावसास सुरुवात झाली. याच वेळी बाभूळगाव, नेरसह, वणी, मारेगाव, कळंब तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यातील गणोरी, आलेगाव, अंतरगाव, दिघी, मुस्ताबाद, वाटखेड, नायगाव, कृष्णापूर, नागरगाव, पंंचगव्हाण, चिमनापूर, पिंपरी इजारा, इंदिरानगर, नांदुरा खुर्द, मालापूर या गावात अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे नुकसान केले. तर नेर तालुक्यातील चिखली कान्होबा, पिंपरी कलगाव येथेही अवकाळी पावसासह गारपीट झाली. कळंब तालुक्यातील सावरगाव, टालेगाव व पिंपळखुटी येथेही अवकाळी पाऊस झाला आहे.

- जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीचे पीक असून सध्या ते काढणीच्या स्थितीत आहे. तर साधारण ८० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा आहे. या  दोन्ही पिकांसह फरदडीचा कापूस आणि पालेभाज्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवेळी कोसळलेल्या या पावसामुळे येणाऱ्या काळात हरभरावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.- मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात गारठा आहे. तापमानाचा पारा १६ वरून १२ गेला होता. त्यातच मंगळवारी सायंकाळी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गारठा वाढण्याची चिन्हे आहेत. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती