शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांचा धान्यसाठा नेरमध्ये पोहोचलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

प्रत्यक्षात नेर तालुक्यात केवळ एक महिन्याचाच धान्य माल दाखल झाला आहे. पुढील दोन महिन्यांच्या धान्यासाठी गरजूंना पुन्हा रांगेत राहावे लागणार आहे. शिवाय किराणा साहित्य खरेदीसाठी पैशांची तडजोड करण्याचा प्रश्न आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून जेवण, रेशन मिळत असले तरी किराणा वस्तू कशा खरेदी करायच्या याची चिंता गरिबांना आहे.

ठळक मुद्देकामे नसल्याने पैसा थांबला : किराणा साहित्य खरेदीचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कोरोनाच्या दहशतीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनने अनेकांचा लहान-मोठा व्यवसाय बंद झाला. विविध प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्या लोकांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला. अशा परिस्थितीत त्यांचे जेवणाचे वांदे होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून तीन महिन्यांचा धान्यसाठा देण्याची घोषणा शासनाने केली.प्रत्यक्षात नेर तालुक्यात केवळ एक महिन्याचाच धान्य माल दाखल झाला आहे. पुढील दोन महिन्यांच्या धान्यासाठी गरजूंना पुन्हा रांगेत राहावे लागणार आहे. शिवाय किराणा साहित्य खरेदीसाठी पैशांची तडजोड करण्याचा प्रश्न आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून जेवण, रेशन मिळत असले तरी किराणा वस्तू कशा खरेदी करायच्या याची चिंता गरिबांना आहे.रेशन दुकानातून एक महिन्याचे धान्य वाटप केले जाणार आहे. मात्र ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही असे नागरिक या लाभापासून वंचित राहणार आहे. याचा सर्वाधिक फटका तालुक्यात असलेल्या फासेपारधी व भटक्या समाजाच्या लोकांना बसणार आहे. रोजगार सुरू होईपर्यंत त्यांना सकाळ-संध्याकाळ कुणाच्या तरी मदतीचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. रेशनकार्डधारकांना टप्प्या-टप्प्याने धान्य वाटप केले जाणार असल्याचे सांगितले जाते.पारधी समाजातील अनेक कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही. एकट्या आजंती पारधी बेड्यावरील ३५ पैकी १२ कुटुंबांकडे कार्ड नाही. त्यामुळे या कुटुंबाला रेशनचे धान्य मिळणार नाही. यातील काही कुटुंब घरोघरी फिरून मिळालेल्या अन्नाद्वारे पोट भरतात. काही शिकार करतात. आता या दोनही सोयी थांबल्या आहे. अशीच काहिशी परिस्थिती रोजगार नसलेल्या लोकांची आहे. अशावेळी त्यांना रेशनचे पूर्ण धान्य मिळणे अपेक्षित आहे.ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना धान्य वाटपासंदर्भात कुठलाही आदेश नाही. यामुळे नियमित रेशनकार्डधारकांनाच धान्य वाटप होईल.- राजेंद्र चिंतकुटलावार,नायब तहसीलदार, नेर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या