शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावरील रेडीयम पट्टीचे काम शासकीय मानकांना डावलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

घुग्घूस येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सिद्दीकी यांनी याविषयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. रस्ता दुभाजकावर लावलेली झाडे अद्याप मोठी झाली नसल्याने रस्ता दुभाजकाच्या दोनही बाजूने झाडांची वाढ होईस्तोवर रेडीयम पेंट मारण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. रस्ता दुभाजकावर झाडांची वाढ न झाल्याने रात्रीच्यावेळी दुतर्फा धावणाºया वाहनांच्या प्रकाशात वाहनचालकांचे डोळे दीपत आहेत.

ठळक मुद्देतक्रारीची चौकशी । बांधकाम अभियंत्यांनी ‘आयव्हीआरसीएल’ला फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यवतमाळ-वणी ते घुग्घूस, पडोली या राज्य महामार्गावरील रस्ता दुभाजकाला रेडीयम पट्टी लावण्याचे काम ठरवून दिलेल्या मानकाला डावलून होत असल्याचे उघड झाले आहे. घुग्घूस येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवर बांधकाम विभागाने चौकशी केली. त्यातून ही बाब उघड झाली. त्यानंतर बांधकाम विभागाने रस्त्याचे काम करणाऱ्या आयव्हीआरसीएल या कंपनीला चांगलेच फटकारले आहे.घुग्घूस येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सिद्दीकी यांनी याविषयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. रस्ता दुभाजकावर लावलेली झाडे अद्याप मोठी झाली नसल्याने रस्ता दुभाजकाच्या दोनही बाजूने झाडांची वाढ होईस्तोवर रेडीयम पेंट मारण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. रस्ता दुभाजकावर झाडांची वाढ न झाल्याने रात्रीच्यावेळी दुतर्फा धावणाºया वाहनांच्या प्रकाशात वाहनचालकांचे डोळे दीपत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असल्याचा दावा सिद्दीकी यांनी केला होता.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आयव्हीआरसीएल कंपनीला पत्र देऊन यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यावर या कंपनीने काम प्रगतीपथावर असल्याचा दावा करत तसे सार्वजनिक बांधकाम विभागालाही कळविले होते. मात्र रेडीयम पट्टी लावण्याचे काम प्रगतीपथावर असताना कुठे १०० मीटरवर, तर कुठे २००, ३००, ५००, ७०० मीटरवर रेडीयम पट्ट्या लावल्या गेल्या. ही बाब लक्षात येताच सिद्दीकी यांनी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार केली. १६ जानेवारीला पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागात याविषयात बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयव्हीआरसीएल कंपनीचे चांगलेच कान टोचले. या कंपनीने अनेक कामे अर्धवट केल्याची बाब उघड झाली असून या विषयात आता २८ जानेवारीनंतर संयुक्त पाहणी करून चौकशी केली जाणार आहे. या बैठकीत रस्त्याच्या स्वच्छतेचाही विषय गाजला.

टॅग्स :highwayमहामार्ग