शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शिक्षकांच्या बदल्यांची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा बदल्या करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून गुरुवारी ग्रामविकास खात्याच्या सचिवांनी आढावा घेतला. या व्हीसीमध्ये बदल्यांसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आता जिल्हा परिषद प्रशासन सेवाज्येष्ठता यादी व अवघड गावांची यादी करण्याच्या कामाला लागले आहे. टीचर ट्रान्स्फर पोर्टलवर शिक्षकांची माहिती त्यांच्या आधार व मोबाइल क्रमांकासह अपडेट करावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या तीन वर्षांपासून रखडलेल्या बदल्यांची प्रक्रिया यंदा राबविली जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी ग्रामविकास खात्याने सीईओ आणि ईओंकडून व्हीसीद्वारे आढावाही घेतला असून, जिल्हा परिषद प्रशासन तयारीला लागले आहे. तसेच बदल्यांसाठी अवघड गावांची यादी आठ दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा बदल्या करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून गुरुवारी ग्रामविकास खात्याच्या सचिवांनी आढावा घेतला. या व्हीसीमध्ये बदल्यांसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आता जिल्हा परिषद प्रशासन सेवाज्येष्ठता यादी व अवघड गावांची यादी करण्याच्या कामाला लागले आहे. टीचर ट्रान्स्फर पोर्टलवर शिक्षकांची माहिती त्यांच्या आधार व मोबाइल क्रमांकासह अपडेट करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा शिक्षकांनी भरलेली माहिती गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर पडताळल्यानंतरच एनआयसीकडे जाणार आहे. ही प्रक्रिया करण्यापूर्वी २५ मार्चपर्यंत युडायस क्रमांक अपडेट करणे, शाळा नोंदणी दुरुस्ती करणे, शिक्षक डाटा चेक करणे, एप्रिलपूर्वी अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे, २५ एप्रिलपर्यंत समानीकरण धोरण जाहीर करणे, १५ एप्रिलपर्यंत रोस्टर अपडेट करणे यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. 

 सव्वाशे गावांची यादी तयार, आणखी भर पडणार- शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी अवघड गावांची यादी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यासाठी सात निकष ठरविण्यात आले आहे. नक्षलग्रस्त क्षेत्रातील गाव, दूरध्वनी सेवा नसलेले गाव, राज्य मार्गापासून दहा किलोमीटरपर्यंत दूर असलेले गाव, अत्यल्प पर्जन्यमान असलेले गाव, जंगल क्षेत्रातील व हिंस्त्रप्राण्यांचा उपद्रव असलेले गाव अवघड क्षेत्राच्या यादीत समाविष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेने मागील वर्षी १२४ गावांची यादी तयार केली आहे. ही यादी यंदाच्या बदली प्रक्रियेसाठी कायम ठेवली जाणार असून नव्या निकषानुसार त्यात जिल्ह्यातील आणखी काही गावांची भर पडणार आहे. 

व्हीसीमध्ये मिळालेल्या निर्देशानुसार बदलीप्रक्रियेवर काम सुरू झाले आहे. काही शिक्षकांचे जुने मोबाईल नंबर बदलले आहे. ते पोर्टलवर अपडेट करणे, आधार लिंक करणे ही कामे आधी करावी लागणार आहे. ३१ मार्चपूर्वी अवघड क्षेत्राची यादी जाहीर होईल. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी

सर्व संघटना आग्रही - शिक्षकांची बदली प्रक्रिया तीन वर्षांपासून सतत रखडत आहे. त्यामुळे यंदा सर्वच शिक्षक संघटना बदल्यांसाठी आग्रही आहे. मधुकर काठोळे, इब्टाचे दिवाकर राऊत, कुलदीप डंभारे तसेच शिक्षक समितीनेही आग्रही भूमिका घेतली आहे.  

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद